⚡ ब्रेकिंग News

प्रियकराच्या लग्नानंतर टोकाचं पाऊल; नागपुरात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने शेवटचा व्हिडिओ कॉल करून आत्महत्या केली

 घरात एकटी असताना घेतला गळफास; प्रेमप्रकरणातील नाउमेदीने उचललं टोकाचं पाऊल

नागपूर – नागपूर जिल्ह्यातील कानोल्हीबारा येथे एका विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हिंगणा येथील आकार नर्सिंग कॉलेजमध्ये अंतिम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय विद्यार्थिनीने प्रियकराला शेवटचा व्हिडिओ कॉल करून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.

प्रियकराच्या लग्नामुळे निर्माण झाला होता तणाव

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीचे नाव विध्येश्वरी दिनेशकुमार आपटे (२३) असून तिचे मूळ गाव वाशिम जिल्ह्यातील संभाजीनगर आहे. ती भोसलेवाडी जवळील डीएनडी हाइट्स या इमारतीतील फ्लॅटमध्ये दोन मैत्रिणींसोबत राहत होती. मागील काही दिवसांपासून ती नैराश्यात असल्याचे समोर आले आहे.

शनिवारी नागपुरातील लक्ष्मीनगर सायंटिफिक सभागृहात महाविद्यालयाचा पदवीदान कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी तिच्या दोन्ही मैत्रिणी गेल्या होत्या. त्यामुळे ती घरात एकटीच होती. याच संधीचा फायदा घेत तिने तिच्या प्रियकराला व्हिडिओ कॉल केला आणि त्यानंतर गळफास घेत आत्महत्या केली.

प्राथमिक माहितीनुसार, विध्येश्वरीच्या प्रियकराचे दोन दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. याच कारणामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

 काटोल-वरूड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा मृत्यू

 दोन वर्षांपूर्वी झालेल्या सिमेंटीकरणानंतरही रस्त्यावर भेगा आणि खड्डेच कायम; प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एक तरुण प्राण गमावून बसला

नागपूर – काटोल-वरूड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावरील भेगा आणि खड्ड्यांमुळे वाहनाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. प्रतीक पांडुरंग निकोसे (रा. जलालखेडा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

दरम्यान, या अपघातात प्रतीक याला डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूरला हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा रस्ता दोन वर्षांपूर्वी सिमेंटीकरण करून पूर्ण करण्यात आला होता. तरीही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा व खड्डे पडलेले आहेत. यापूर्वीही याच रस्त्यावर अनेक अपघातांची नोंद झाली आहे, मात्र प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाकडून तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांनी पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...