⚡ ब्रेकिंग News

सातारा एसपी निलंबनावरून नवा वाद; राम शिंदे गोऱ्हेंचा निर्णय फिरवणार? वातावरण तापले


सातारा एसपी निलंबनावरून नवा वाद; राम शिंदे गोऱ्हेंचा निर्णय फिरवणार? वातावरण तापले

उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या आदेशाला सभापती राम शिंदे स्थगिती देणार की कायम ठेवणार? भाजपच्या जयकुमार गोरे यांचे गंभीर आक्षेप

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील  राड्याप्रकरणी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. मात्र, हे आदेश कायम राहणार की सभापती राम शिंदे या निर्णयाला स्थगिती देणार, यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या निलंबन निर्णयावरून विधान परिषदेत भाजप आणि शिवसेना आमने-सामने आल्या आहेत.

सभापती राम शिंदे काय निर्णय घेणार?

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या आदेशाला सभापती राम शिंदे स्थगिती देणार की आदेश कायम ठेवणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. सभापती राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणी चर्चा केल्याची माहिती आहे. त्यामुळे गोऱ्हेंचा निर्णय फिरवला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

जयकुमार गोरे यांचे कडाडून आक्षेप

भाजपचे मंत्री जयकुमार गोरे  यांनी उपसभापतींच्या निर्णयाला विरोध दर्शवत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी एसपींचे निलंबन तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे.

जयकुमार गोरे यांचे प्रमुख आक्षेप:

 वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता केवळ चर्चेवर आधारित निलंबनाचे आदेश कसे दिले?

 पालकमंत्री शंभुराज देसाई आणि मकरंद पाटील हे मंत्री जिल्हा परिषद आवारात गेलेच कसे?

 या दोन मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश का मोडले?

 जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था का मोडली?

 बंदोबस्तावरील पोलिसांना शिवीगाळ का केली?

 जिल्हा परिषद आवारात पाच हजार कार्यकर्ते कोणाच्या आदेशाने आले?

उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे आदेश काय?

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा प्रकरणाची गंभीर दखल घेत खालील आदेश दिले आहेत:

१. सातारा पोलीस अधीक्षकांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश

२. जिल्हा परिषद आवारातील सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे निर्देश

३. या प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून करावी

साताऱ्यात नेमकं काय घडलं?

एकूण जागा: ६५, बहुमतासाठी ३३ जागा आवश्यक

 शिवसेना-राष्ट्रवादी युतीकडे ३५ जागा (बहुमत)

 भाजपकडे २७ जागा (सर्वात मोठा पक्ष)

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय झाले?

 भाजपने शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे ३ आणि १ अपक्ष असे एकूण ६ सदस्य फोडले

 पोलिसांनी राष्ट्रवादीचे दोन सदस्य (अनिल देसाई, संदीप मांडवे) यांना अपहरणाच्या गुन्ह्याखाली उचलून नेल्याचा आरोप

 शिवसेनेचे दोन सदस्य (हणमंत जगदाळे, सारिका फाळके) फुटल्याची माहिती

 इतर दोन सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखल्याचा शिवसेनेचा आरोप

शिवसेनेची आक्रमक भूमिका

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री आणि आमदार आक्रमक झाले आहेत. सत्तेत असतानाही आपल्याला दुय्यम वागणूक मिळत असल्याची नाराजी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. सातत्याने होत असलेल्या गळचेपीवर बोलण्याची वेळ आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...