⚡ ब्रेकिंग News

मुंबई-नाशिक हायवेवर भीषण अपघात; वेगवान वाहनाच्या धडकेत दोन ऑटोचालकांचा चेंदामेंदा, जागीच मृत्यू

  मुंबई-नाशिक हायवेवर भीषण अपघात; वेगवान वाहनाच्या धडकेत दोन ऑटोचालकांचा चेंदामेंदा, जागीच मृत्यू

सोनाळे परिसरात अज्ञात वाहनाची जोरदार धडक; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा दुर्दैवी अंत

ठाणे  मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे परिसरात एक भीषण अपघात घडला असून, या अपघातात भिवंडीतील दोन ऑटो रिक्षा चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अज्ञात वेगवान वाहनाने ऑटो रिक्षाला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील घुंघट नगर परिसरात राहणारे राजकुमार गुप्ता (वय ४०) आणि महेंद्र केसरवानी (वय ३९) हे दोन्ही ऑटोचालक एकाच ऑटो रिक्षातून (क्रमांक MH 04 KA 3124) भिवंडी बायपासमार्गे सोनाळेच्या दिशेने जात होते. सोनाळे परिसरात पोहोचताच मागून आलेल्या एका अज्ञात वेगवान वाहनाने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ऑटोचा चेंदामेंदा झाला आणि दोन्ही चालक रस्त्यावर फेकले गेले.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने दोन्ही जखमींना भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करताच दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

रिक्षा परवान्याला स्थगिती

दरम्यान, वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने नव्या रिक्षा परवान्यांवर बंदी आणली आहे. हा निर्णय आजपासून लागू करण्यात आला असून, यामुळे नवे रिक्षा परवाने मिळण्यास स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयावर रिक्षा चालकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...