⚡ ब्रेकिंग News

खासदार विशाल पाटील यांचा केला मोठा दावा - सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का:

सांगली | प्रतिनिधी  

सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आज उत्साहपूर्ण मतदान पार पडले. खासदार विशाल पाटील यांनी कुटुंबासह वसंतदादांच्या जन्मगावी पद्माळे येथे मतदान केले. मतदानानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. "या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसणार असून, जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सत्तेत येईल," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भ्रष्टाचार रोखण्यासाठी सुज्ञ मतदानाचे आवाहन 

पाटील म्हणाले, "जिल्हा परिषद ही महत्त्वाची संस्था आहे. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी चांगल्या उमेदवारांची निवड होणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत लोक बदलासाठी उत्स्फूर्तपणे मतदान करत आहेत. ही निवडणूक चार वर्षे प्रलंबित होती, जी न्यायालयाच्या आदेशाने घेतली गेली. जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावे."

महापालिकेप्रमाणेच भाजपचा पराभव अटळ

भाजपच्या रणनीतीवर टीका करताना पाटील म्हणाले, "महापालिका निवडणुकीत सत्ता, पैसा आणि इतर पक्षांच्या उमेदवारांना गोळा करूनही भाजपचा आकडा कमी झाला. मतविभागणीमुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला, पण आमच्या आघाडीला जास्त मते मिळाली. जिल्हा परिषदेत सत्ता-पैशाने मते मिळत नाहीत, हे निकालातून स्पष्ट होईल."

आघाडीला स्पष्ट बहुमताचा विश्वास

सांगली जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा पाटील यांनी केला. सत्ताधाऱ्यांविरुद्ध लोकरोष आणि बदलाची लाट असल्याचे सांगत, महाविकास आघाडीचा वरचष्मा कायम राहील, असा संकेत त्यांनी दिला.


Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...