⚡ ब्रेकिंग News

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; दोघांविरुद्ध पोक्सोसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल


फोटो व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी; म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद

म्हसवड | प्रतिनिधी

माण तालुक्यातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश महादेव खांडेकर (रा. खडकी, ता. माण, जि. सातारा) आणि योगेश कर्चे (पूर्ण नाव व पत्ता अद्याप निष्पन्न नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 199/2026 नोंद करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, 24 जून 2026 ते 13 जुलै 2026 या कालावधीत मौजे परेंती (ता. माण) येथील फिर्यादीच्या राहत्या घरी तसेच पुणे–जेजुरी मार्गावरील एका ठिकाणी आरोपींनी लग्नाचे आमिष दाखवून व जेजुरी येथे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात BNS कलम 64, 64(2)(m), 65(1), 96, 351(2)(3), 3(5) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 4, 6, 8, 12 व 17 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार 19 जुलै 2026 रोजी दाखल झाली असून पुढील तपास म्हसवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक करीत आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...