पाटणा : बिहारच्या राजकारणात मोठा खांदेपालट होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांची राज्यसभेवर जाण्याची शक्यता असून, त्यांच्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होण्याची चर्चा आहे. त्याचबरोबर नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांची राजकारणात एन्ट्री होत असून त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळू शकते.
बिहारमध्ये घडामोडींना वेग आला असून, राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राज्यसेवेवर जाण्याची जोरदार चर्चा आहे. एनडीए आघाडीला पाच राज्यसभेच्या जागा मिण्याची शक्यता असून, त्यापैकी दोन जागा संयुक्त जनता दलाला (जेडीयू) मिळणार आहेत. या दोन जागांपैकी एका जागेवरून नितीश कुमार यांना दिल्लीला पाठवण्याची योजना आखली जात असल्याचे सांगितले जात आहे.
नितीश कुमार यांच्या दिल्ली प्रस्थानानंतर बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर भाजपचा दावा अधिक भक्कम होणार आहे. विधानसभेत भाजपचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांची राजकारणात एन्ट्री होणार असून, त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. यामुळे बिहारमध्ये नवे राजकीय समीकरण पाहायला मिळू शकते.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.