⚡ ब्रेकिंग News

पशुपालकांसाठी मोठा दिलासा! पुरात मृत पावलेल्या सर्व जनावरांसाठी मदत; सरकारकडून नियमात महत्त्वपूर्ण बदल

दुधाळ जनावरे, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्यांसाठी मदतीची रक्कम निश्चित; अल्पभूधारक-भूमिहीन पशुपालकांनाही लाभ

मुंबई : राज्यात गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी पशुपालक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या नियमांमध्ये राज्य सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे आतापर्यंत मदतीपासून वंचित राहिलेल्या पशुपालकांनाही दिलासा मिळणार आहे. पुरात मृत पावलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या सर्व जनावरांसाठी आता मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी मदतीसाठी जनावरांच्या संख्येची मर्यादा होती. मात्र, आता ही मर्यादा शिथिल करण्यात आली असून अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांऐवजी सर्व आपदग्रस्त पशुपालक मदतीसाठी पात्र ठरणार आहेत.

नियमातील महत्त्वपूर्ण बदल असे :

मोठी दुधाळ व ओढकाम करणारी जनावरे : प्रत्येक पशुपालकाला कमाल ३ जनावरांऐवजी आता मृत किंवा बेपत्ता असलेली सर्व मोठी दुधाळ व ओढकाम करणारी जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.

ओढकाम करणारी लहान जनावरे : प्रत्येक पशुपालकाला कमाल ६ जनावरांऐवजी आता मृत किंवा बेपत्ता असलेली सर्व ओढकाम करणारी लहान जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.

लहान दुधाळ जनावरे : प्रत्येक पशुपालकाला कमाल ३० जनावरांऐवजी आता मृत किंवा बेपत्ता असलेली सर्व लहान दुधळ जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.

कुक्कुटपालन : प्रत्येक पशुपालकाला कमाल १०० कुक्कुटपक्षांसाठी १० हजार रुपयांच्या मर्यादेऐवजी आता मृत व बेपत्ता असलेले सर्व कुक्कुटपक्षी मदतीसाठी पात्र असतील.

पशुपालकांना देण्यात येणारी मदत (प्रति जनावर) :

दुधाळ जनावरे (गाय, म्हशी) – ३७ हजार ५०० रुपये

ओढकाम करणारी जनावरे (बैल, रेडे) – ३२ हजार रुपये

हान जनावरे (गाढव, उंट, घोडे, खेचर) – २० हजार रुपये

शेळी व मेंढी – ४ हजार रुपये

कोंबडी (कुक्कुटपक्षी) – १०० रुपये प्रति कोंबडी

पडझड झालेल्या गोठ्यासाठी – ३ हजार रुपये (प्रति गोठा)

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुरात मोठ्या प्रमाणात जनावरे गमावलेल्या पशुपालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेषतः लहान शेतकरी आणि भूमिहीन पशुपालकांसाठी हा निर्णय अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...