⚡ ब्रेकिंग News

ऑन ड्युटी सफाई कामगाराची भरदिवसा हत्या; पतीची बातमी कानी पडताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगर हादरले

 ऑन ड्युटी सफाई कामगाराची भरदिवसा हत्या; पतीची बातमी कानी पडताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगर हादरले

 एका घटनेने संपवले दोन जीव; कुटुंबाची दुहेरी शोकांतिका, सीसीटीव्हीमध्ये कैद झाला हल्ला

 उल्हासनगरमध्ये एका महापालिका कर्मचाऱ्याची ऑन ड्युटी हत्या केल्याची घटना घडली असून, या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीच्या हत्येची बातमी कळताच पत्नीने आत्महत्या केल्याने एकाच कुटुंबाची दुहेरी शोकांतिका घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे उल्हासनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगार असलेले महादू जगताप हे कॅम्प ३ मधील सेक्शन २० परिसरात सकाळी साफसफाईचे काम करत होते. त्याचवेळी एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. या हल्ल्यात महादू जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हल्लेखोर फरार झाला आहे. पोलिस फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.

महादू जगताप यांच्या हत्येची बातमी घरी पोहोचताच त्यांच्या पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला. पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्यांनीही आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. या दोन घटनांनी संपूर्ण परिसराला धक्का बसला आहे. दरम्यान, या हत्येमुळे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमध्या संतापाचे वातावरण असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...