⚡ ब्रेकिंग News

'सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मेलेल्या बायकोजवळ बसून रडत खेळला नाटक!' बुलढाण्यातील कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला

 

 'सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मेलेल्या बायकोजवळ बसून रडत खेळला नाटक!' बुलढाण्यातील कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला

 शिक्षिका पत्नीची हत्या करणाऱ्या पतीसह तिघांना पोलीस कोठडी; अपघाताचा बनाव उघडकीस

बुलढाणा  जिल्ह्यात एक खूनी रहस्य उघडकीस आले असून, पतीनेच आपल्या शिक्षिका पत्नीची हत्या करण्याची सुपारी दिल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे २ मार्च रोजी वृषाली प्रकाश गावंडे या शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. मात्र, हा अपघात नसून पतीने रचलेलं कटकारस्थान असल्याचं तपासात उघड झालं.

घटनेच्या दिवशी जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेत ड्युटीवर जात असताना वृषाली यांच्या स्कुटीला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस पोहोचले तेव्हा वृषाली यांचे पती प्रकाश गावंडे हे मृतदेहाशेजारी बसून रडत होते. सर्वांना हा साधा अपघात वाटला. मात्र, माहेरच्या कुटुंबीयांनी घातपाताची शंका व्यक्त केल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि फोन कॉलचे रेकॉर्ड तपासले. या तपासातून धक्कादायक सत्य उघड झाले.

पोलिसांनी संशयित वाहनचालक मंगेश सूर्यवंशी याला ताब्यात घेतले असता त्याने सांगितले की, वृषाली यांचे पती प्रकाश गावंडे आणि मध्यस्थ मंगेश चहुळकर यांनी त्याला एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. या पैशाच्या मोबदल्यात त्याने टाटा पिकअप वाहनाने वृषाली यांच्या स्कुटीला धडक दिली. या खुलाशानंतर पोलिसांनी पती प्रकाश गावंडे आणि मित्र मंगेश चहुळकर यांना अटक केली. तिन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जळगाव-जामोद पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी केलेल्या कसून तपासामुळे हा खून उघडकीस आला असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...