⚡ ब्रेकिंग News

मुंबईत बेकायदा पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाईचा बडगा; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द

 

 मुंबईत बेकायदा पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाईचा बडगा; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द

 नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकासह आता बाईक मालकावरही गुन्हा दाखल करणार; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई बाईक टॅक्सी क्रॅकडाउन : मुंबईत बेकायदेशीररित्या चालवल्या जाणाऱ्या पेट्रोल बाईक टॅक्सीवर राज्य सरकारने आता कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परिवहन विभागाने रॅपिडो, ओला आणि उबर या कंपन्यांना दिलेला बाईक टॅक्सीचा परवाना तात्पुरता रद्द केला आहे. तसेच आता केवळ चालकच नव्हे तर बेकायदा पेट्रोल बाईक टॅक्सी चालवणाऱ्या बाईक मालकावरही थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सरकारने सुरुवातीला ई-बाईक टॅक्सीलाच परवानगी दिली होती. मात्र ओला, उबर आणि रॅपिडो या कंपन्यांनी इलेक्ट्रिक बाईकऐवजी पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकचा वापर सुरू ठेवला. वारंवार कारवाई करूनही हे चुकीचे प्रकार थांबले नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे या तिन्ही कंपन्यांचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला असून, कंपन्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कालावधीतही कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल, असा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिला आहे.

नव्या निर्णयानुसार बेकायदा पेट्रोल बाईक टॅक्सी चालवताना आढळल्यास संबंधित बाईक जप्त करण्यात येईल, तसेच चालकासह बाईक मालकाविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईतील बेकायदा बाईक टॅक्सी सेवेवर पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...