⚡ ब्रेकिंग News

महाराष्ट्र केसरी किताब जिंकताच ५ मिनिटांत हर्षवर्धन सदगीरचा धक्कादायक निर्णय; सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं?


महाराष्ट्र केसरी किताब जिंकताच ५ मिनिटांत हर्षवर्धन सदगीरचा धक्कादायक निर्णय; सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं?

सातवा डबल महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर निवृत्तीची घोषणा; आर्थिक अडचणी, नोकरीची हताशा अन् हिमतीच्या जोरावर पुन्हा शिखर गाठण्याची प्रेरणादायी कहाणी

पुणे: ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हर्षवर्धन सदगीर  याने महेंद्र गायकवाड याचा ४-३ असा पराभव करत सातवा डबल महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. विजयानंतर आनंद साजरा करण्याऐवजी सदगीरने मात्र धक्कादायक निर्णय जाहीर केला. स्पर्धा संपल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत त्याने मॅटवरील कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली. या निर्णयाने सर्वच चक्रावून गेले.

"या क्षणासाठी खूप कष्ट केले"

विजयानंतर भावुक झालेल्या हर्षवर्धन सदगीर म्हणाले, "या क्षणासाठी मी खूप कष्ट केले आहेत. डबल महाराष्ट्र केसरी होणं हे माझ्यासाठी अभिमानाचं स्वप्न होतं." त्याने सांगितले की, २०१९ आणि २०२० मध्ये महाराष्ट्र केसरी किताब जिंकल्यानंतर त्याचं मोठं स्वप्न पूर्ण झालं होतं. मात्र, त्यानंतरच्या काळात आर्थिक अडचणींमुळे त्याला शासकीय नोकरीची गरज भासली.

दीड वर्षांची हताशा, पण हार नाही

सदगीरने भावनिक मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, "मी दीड वर्ष विविध नेत्यांना भेटलो, प्रयत्न केले, पण नोकरी मिळाली नाही. तरीही मला त्याची खंत नव्हती." या प्रवासात अनेकांनी आपल्याला संपलेलं समजलं, पैलवान म्हणून कमी लेखलं, अशी खंतही त्याने व्यक्त केली. पण त्याच वेळी हार न मानता पुन्हा मेहनत घेतली आणि डबल महाराष्ट्र केसरी बनून दाखवलं.

"आता मला नोकरीची गरज नाही"

महेंद्र गायकवाड याच्याबद्दल बोलताना सदगीर म्हणाला, "तो माझ्यासाठी लहान भावासारखा आहे." तसेच आपल्या यशाचं श्रेय त्याने काका पवार यांच्या तालमीला दिले. विजयानंतर भावनिक अवस्थेत सदगीरने सांगितले, "आज मी हिमतीच्या जोरावर पुन्हा शिखर गाठलं आहे. मोठं बक्षीस जिंकलं आहे. आता मला नोकरीची गरज नाही."

निवृत्तीचा धक्कादायक निर्णय

सातवा डबल महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकल्यानंतर लगेचच निवृत्तीची घोषणा करून हर्षवर्धन सदगीरने कुस्तीक्षेत्रात मोठी चर्चा निर्माण केली आहे. आर्थिक अडचणी, नोकरीची हताशा आणि त्यानंतर हिमतीच्या जोरावर पुन्हा उभं राहण्याची ही प्रेरणादायी कहाणी सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...