मुंबई: मराठी मालिकांच्या प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्री मयुरी कापडणे हिने गुपचूप विवाह केल्याची बातमी समोर आली आहे. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘उदे गं अंबे’मधून सध्या चर्चेत असलेल्या मयुरीने २७ मार्च रोजी ठाण्यातील प्रसिद्ध बिझनेसमन स्वप्नील मराठे यांच्याशी लग्न केले.
मयुरी कापडणे ही मूळची पुण्यातील रहिवासी असून, तिने मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केले आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत तिने कधीही खुलासा केला नव्हता. ती कधीही कोणत्याही ‘मिस्ट्री मॅन’सोबत स्पॉट झालेली नव्हती. त्यामुळे तिच्या लग्नाची बातमी समोर येताच अनेकांना धक्का बसला.
लग्न अगदी सिंपल आणि खासगी पद्धतीने पार पडले. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘इट्स मज्जा’नेही हे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले असून, त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक मराठी सेलिब्रिटींनी नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
मयुरी कापडणे सध्या ‘उदे गं अंबे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिचा चाहतावर्ग मोठा असल्याने तिच्या लग्नाची बातमी मराठी मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय बनली आहे.
अपूर्वा गोरे, पुजा बिरारी, अपूर्वा नेमळेकर यांच्यानंतर मयुरी कापडणेच्या लग्नाने मराठी कलाकारांच्या लग्नघाईला आणखी एक भर पडली आहे. नवविवाहित जोडप्याला पुढील वैवाहिक जीवनासाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.