⚡ ब्रेकिंग News

मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला राजकीय-बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी


मुख्यमंत्री फडणवीस, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अनंत अंबानी ते शाहरुख खान... मुंबईत एका हॉटेलमध्ये राजकीय वैर विसरून सर्वपक्षीय नेते आणि सिनेसृष्टीतील दिग्गज एकत्र

मुंबई : भाजप नेते आणि व्यावसायिक मोहित कंबोज यांच्या कन्या मिश्का कंबोज हिच्या १६व्या वाढदिवसाचा सोहळा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शाही थाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात राजकीय क्षेत्रातील दिग्गजांसह बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी हजेरी लावल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले.

या सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीच्या काळात मोहित कंबोज यांच्याशी तीव्र संघर्ष असलेले युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

अंबानी कुटुंबीयांची देखील विशेष हजेरी होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि त्यांची पत्नी राधिका मर्चंट यांनी मिश्का कंबोजला शुभेच्छा दिल्या.

बॉलिवूडच्या दिग्गजांनी कार्यक्रमात रंगत भरली. किंग खान शाहरुख खान यांनी उपस्थितीने सर्वांना आश्चर्यचकित केले. रणवीर सिंह यांनी स्टेजवर आपल्या गाण्यांच्या टायटल ट्रॅकवर जबरदस्त परफॉर्मन्स दिला, ज्याला संजय दत्त यांनी उत्स्फूर्त दाद दिली. सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी, मान्यता दत्त, अमृता अरोरा आदी अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याची शोभा वाढवली.

या कार्यक्रमामुळे राजकीय वैर विसरून सर्वपक्षीय नेते एकाच छताखाली आल्याचे चित्र दिसले. एकीकडे शिंदे गट-भाजपमधील काही मुद्द्यांवरून नाराजीची चर्चा असताना, दुसरीकडे भाजप नेत्याच्या घरच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंची उपस्थिती भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्क-वितर्कांना उधाण देत आहे.

मोहित कंबोज यांच्या कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या या भव्य सोहळ्याने मुंबईतील हॉटेलमध्ये चांगलीच चर्चा निर्माण केली असून, मिश्का कंबोजच्या वाढदिवसाची चर्चा आता देशभरात रंगली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...