⚡ ब्रेकिंग News

"विराट कोहली संपला...?"; RCB च्या विजयानंतर मोहम्मद कैफची पोस्ट व्हायरल, नेमकं काय लिहिलं?

 


ऑस्ट्रेलियात शून्यावर बाद झाल्यानंतर टीका करणाऱ्यांना कैफचं सडेतोड उत्तर; म्हणाले, "शेवटच्या १० डावांतील आकडेवारी पाहा"

मुंबई – आयपीएलच्या १९ व्या हंगामात आरसीबीने पहिल्याच सामन्यात हैदराबादवर धमाकेदार विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने ३८ चेंडूत ५ चौकार व ५ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ६९ धावांची शानदार खेळी केली. या खेळीनंतर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

 कैफने पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं?

मोहम्मद कैफ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "ऑस्ट्रेलियात दोनदा शून्यावर बाद झाल्यानंतर लोक विराट कोहली संपला असे म्हणत होते. पण व्हाईट बॉल क्रिकेटमधील त्याच्या शेवटच्या १० डावांतील धावा पाहा – ७४, १३५, १०२, ६५, १३१, ७७, ९३, २३, १२४ आणि या सामन्यातील ६९ नाबाद."

या वक्तव्यातून कैफ यांनी विराटवर टीका करणाऱ्यांना जोरदार उत्तर दिले आहे.

 विराटची आयपीएलमधील कमाल

विराट कोहली हा आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून, त्याच्याशिवाय अद्याप कोणताही खेळाडू ८ हजार धावांचा टप्पा पार करू शकलेला नाही. त्याची सध्याची फॉर्म पाहता, तो सर्वात आधी ९ हजार धावांचा टप्पा गाठणारा खेळाडू ठरू शकतो, अशी चिन्हे दिसत आहेत.

 पुढील सामना CSK विरुद्ध

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात विराटने १८१.५८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. RCB चा पुढील सामना आता ५ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध होणार आहे, जो चाहत्यांसाठी अत्यंत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...