⚡ ब्रेकिंग News

'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर प्राणघातक हल्ला; परळीतील थरारक घटनेने खळबळ

 

 'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर प्राणघातक हल्ला; परळीतील थरारक घटनेने खळबळ

 लोखंडी रॉड आणि पाईपने बेदम मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

बीड:  जिल्ह्यातील परळी शहरात भर बाजारात एका तरुणावर टोळक्याने लोखंडी रॉड आणि पाईपने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. "तुला खूप मस्ती आली आहे. तू आमच्या विरोधात काम केलेस," अशा आरोपाच्या रागातून हा सार्वजनिक हल्ला करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, परळी शहरातील अरुणोदय मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्या तरुणाला आरोपींनी रोखले. शिवीगाळ करत लोखंडी रॉड व पाईपने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. मात्र, नागरिकांनी धाव घेत जखमीची सुटका केली.

याप्रकरणी शेख हशब, शेख हाफिज, शेख शोफुला, शेख साकेब आणि शेख आलिम या पाच जणांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.


Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...