मैत्रीच्या आड अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतराचा दबाव, कुटुंबाला संपवण्याची धमकी
इगतपुरीतील संतापजनक घटना; २०२२ पासून सुरू होते अत्याचाराचे सत्र, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
इगतपुरी : मैत्रीचे नातं निर्माण करून विश्वास संपादन केला आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचे सत्र सुरू केले. धर्म लपवून फसवणूक करतानाच कुटुंबाला संपवण्याची धमकी देऊन धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची संतापजनक घटना इगतपुरी शहरातून समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय युवतीने इगतपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, २०२२ मध्ये ती अल्पवयीन असताना आरोपी मुस्तफा शेख याने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी कोणाला सांगितल्यास कुटुंबाला संपवण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच, घरात घुसून दोन वेळा जबरदस्तीने बलात्कार केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
पीडित युवतीने पुढे म्हटले आहे की, आरोपीने धर्मांतरासाठी वेळोवेळी दबाव टाकला. धर्म लपवून फसवणूक केल्याचाही आरोप तिने केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुस्तफा शेख याच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून पीडितेला न्याय मिळावा यासाठी स्थानिकांकडून मागणी होत आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.