⚡ ब्रेकिंग News

"आता जा, बाळा... शांत जा..." हरीश राणाच्या इच्छामरणाची तयारी सुरू; शेवटच्या व्हिडिओने देश हळहळला

"आता जा, बाळा... शांत जा..." हरीश राणाच्या इच्छामरणाची तयारी सुरू; शेवटच्या व्हिडिओने देश हळहळला

सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर एम्समध्ये लाइफ सपोर्ट काढला; १३ वर्षांपासून कोमात होता हरीश

नवी दिल्ली : भारताच्या न्यायव्यवस्थेतील एक अत्यंत संवेदनशील आणि ऐतिहासिक प्रकरण आता अंतिम टप्प्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाने हरीश राणा या ३२ वर्षीय तरुणाला निष्क्रिय इच्छामरणाची  परवानगी दिल्यानंतर आता त्याचे कुटुंबीय त्याला अखेरचा निरोप देण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर हरीश राणाचा एक अत्यंत भावूक व्हिडिओ समोर आला असून, त्याने संपूर्ण देशाला हळहळत केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर हरीश राणाला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची लाइफ सपोर्ट सिस्टीम हळूहळू काढून टाकण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला हरीशच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावताना दिसत आहे. डोक्यावरून हात फिरवत ती म्हणते, "सर्वांना माफ कर... सर्वांची माफी मागत जा... आता जा, बाळा... शांत जा..." हा व्हिडिओ पाहून कोणाचीही डोळ्यांत अश्रू येणे अपरिहार्य ठरते.

नेमकं प्रकरण काय?

हरीश राणा हा २०१३ मध्ये चंदीगडमध्ये विद्यार्थी असताना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडला होता. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर इजा पोहोचली आणि तो गेली १३ वर्षे व्हेजिटेटिव्ह स्टेट (कोमा) मध्ये होता. त्याच्या डोक्यातील नसा सुकून गेल्या होत्या. आपल्या मुलाला या अवस्थेत पाहू न शकल्यामुळे त्याच्या वृद्ध पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली होती. त्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली ही भारतातील पहिलीच घटना आहे.

न्यायालयाने काय म्हटले?

न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना भावूक झाल्याचे दिसून आले. न्यायालयाने म्हटले, "एखाद्या मुलाला अनंत काळापर्यंत अशा स्थितीत ठेवू शकत नाही." तसेच हरीशच्या पालकांच्या १३ वर्षांच्या धैर्याचे आणि समर्पणाचे कौतुकही न्यायालयाने केले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाला हरीशला दाखल करून घेण्याचे आणि वैद्यकीय देखरेखीखाली त्याचे लाइफ सपोर्ट टप्प्याटप्प्याने काढण्याचे निर्देश दिले होते.

हरीश राणाचा हा शेवटचा प्रवास सुरू झाला असून, त्याच्या या निर्णयामुळे संपूर्ण देशात इच्छामरण आणि जीवनाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...