⚡ ब्रेकिंग News

रेमंडला जागतिक ओळख देणारे विजयपत सिंघानिया काळाच्या पडद्याआड; उद्योगविश्वातील दिग्गज ८७ व्या वर्षी मुंबईत निधन

हॉट एअर बलूनने जागतिक उंचीचा विक्रम करणारे एव्हिएटर आणि रेमंडचे शिल्पकार विजयपत सिंघानिया यांचे निधन; रविवारी अंत्यसंस्कार

मुंबई: देशातील प्रसिद्ध उद्योगपती, पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र आणि रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी दिली.

विजयपत सिंघानिया हे केवळ एक यशस्वी उद्योगपती नव्हते, तर ते एक कुशल एव्हिएटर म्हणूनही ओळखले जात होते. हॉट एअर बलूनद्वारे सर्वाधिक उंची गाठण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या साहसी वृत्तीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले.

रेमंडचा छोटा मिल ते जागतिक ब्रँड  

विजयपत सिंघानिया यांनी रेमंड या वस्त्र ब्रँडला देश-विदेशात जागतिक ओळख मिळवून दिली. १९५८ मध्ये मुंबईत पहिले रेमंड शोरूम सुरू करून त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली. १९६० मध्ये परदेशातून आधुनिक मशिनरी आणून उत्पादन क्षमता वाढवली. १९८० मध्ये कंपनीची सूत्रे हाती आल्यानंतर त्यांनी रेमंडचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला.

१९८६ मध्ये ‘पार्क अव्हेन्यू’ परफ्यूम ब्रँड लाँच करून त्यांनी फॅब्रिकच्या पलीकडे जाऊन विविध क्षेत्रांत प्रवेश केला. १९९० मध्ये परदेशात पहिले शोरूम सुरू करून रेमंडला जागतिक ब्रँड बनवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

नेतृत्व हस्तांतर

सुमारे दोन दशके कंपनीचे नेतृत्व केल्यानंतर विजयपत सिंघानिया यांनी कंपनीची जबाबदारी आपल्या मुलगा गौतम सिंघानिया यांच्याकडे सोपवली होती. त्यांनी आपली ३७ टक्के भागीदारीही मुलाच्या नावावर केली होती.

अंत्यसंस्कार

विजयपत सिंघानिया यांच्यावर रविवार, २९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या निधनाने उद्योग, विमानचालन आणि सामाजिक क्षेत्रात एक युग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अनेक उद्योगपती, राजकीय नेते आणि नागरिकांनी त्यांच्या जाण्याने दुःख व्यक्त केले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...