⚡ ब्रेकिंग News

घरातील जुना स्टोव्ह आता पुन्हा बाहेर काढा; केंद्र सरकारकडून केरोसीन वाटपास मंजुरी, प्रत्येक कुटुंबाला मिळणार एवढे लिटर

 घरातील जुना स्टोव्ह आता पुन्हा बाहेर काढा; केंद्र सरकारकडून केरोसीन वाटपास मंजुरी, प्रत्येक कुटुंबाला मिळणार एवढे लिटर

 गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केरोसीन वाटपाचा निर्णय घेतला आहे. शिधापत्रिकाधारकांसह श्वेतपत्रिकाधारकांनाही याचा लाभ मिळणार आहे.

आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा सामना देशातील सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे. गॅस टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले असून, एकीकडे गॅस एजन्सीमध्ये पुरवठ्याबाबत नियमावली तयार करण्यात आली असून व्यावसायिक गॅस पुरवठाही बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलत केंद्र सरकारकडून ३७ लाख ४४ हजार लिटर केरोसीनच्या वाटपास मंजुरी मिळवली आहे. त्यामुळे आता गॅस आल्यानंतर कोपऱ्यात पडलेला जुना स्टोव्ह पुन्हा बाहेर काढावा लागणार आहे.

प्रति कुटुंब किती केरोसीन मिळणार?

राज्यातील शिधापत्रिका धारकांना एका शिधापत्रिकेमागे ३ लिटर केरोसीन मिळणार आहे. एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तात्पुरत्या स्वरूपात हे केरोसीन वाटप करण्यात येणार आहे. राज्य सरकारने जिल्हानिहाय आवश्यक केरोसीन वितरण निश्चित केले असून मार्च-एप्रिल २०२६ मध्ये राज्यात तिन्ही सरकारी तेल कंपन्यांकडून केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे.

एकूण वाटपाच्या ८५ टक्के केरोसीन पहिल्या पंधरवड्यात सोडण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका आहे, त्यांना ३ लिटर केरोसीन मिळणार आहे. तर ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही, अशी कुटुंबेही केरोसीन उपलब्धतेनुसार वितरणास पात्र राहतील. प्रतिसादाच्या अनुषंगाने श्वेतपत्रिकाधारक देखील केरोसीन मिळण्यास पात्र असतील, अशी माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान मोदींचे आवाहन

आखाती देशातील इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत असून तेल आणि इंधन पुरवठा अपुरा पडत असल्याचे दिसून येत आहे. घरगुती ग्राहकांना कोणतीही अडचण भासणार नाही, यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना कोरोनासारख्या परिस्थितीसाठी आपण सज्ज राहायला हवे, असे आवाहन देशवासीयांना केले आहे. या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईमुळे सरकारकडून केरोसीन वितरणास परवानगी देण्यात आली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...