⚡ ब्रेकिंग News

डोंबिवलीची शोभायात्रा ते गावची जत्रा! 'झी मराठी' कलाकारांचा गुढीपाडवा प्लॅन ऐकून व्हाल थक्क

डोंबिवलीची शोभायात्रा ते गावची जत्रा! 'झी मराठी' कलाकारांचा गुढीपाडवा प्लॅन ऐकून व्हाल थक्क

गुढीपाडव्याला प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'शुभ श्रावणी', 'कमळी', 'सनई चौघडे'च्या कलाकारांची टीम; पुरणपोळी, बासुंदीपुरी आणि ग्रामदेवतेच्या यात्रेचे खास प्लॅनिंग

मुंबई: महाराष्ट्राचा सांस्कृतिक सण असलेला गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. घरोघरी गुढी उभारून, पारंपारिक पदार्थांचा आस्वाद घेत हा सण आनंदात साजरा केला जातो. यंदाच्या गुढीपाडव्याला झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांचे कलाकार प्रेक्षकांसाठी खास प्लॅन घेऊन आले आहेत. डोंबिवलीच्या भव्य शोभायात्रेपासून ते गावच्या जत्रेपर्यंत, कलाकारांचा हा प्लॅन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

शुभ श्रावणीची टीम डोंबिवलीत

'शुभ श्रावणी' मालिकेतील अभिनेत्री वल्लरी विराज म्हणाली, "यंदा गुढीपाडव्याला डोंबिवलीच्या शोभायात्रेत 'शुभ श्रावणी'ची संपूर्ण टीम सहभागी होणार आहे. प्रेक्षकांना जवळून भेटण्याची ही सुवर्णसंधी असते. मी पारंपारिक पोशाखात या शोभायात्रेत सहभागी होणार आहे. घरी गुढी उभारून आईच्या हातची बासुंदी पुरी खाण्याचा आनंद वेगळाच असतो."

कमळी फेम विजया बाबरचा जत्रेचा प्लॅन

'कमळी' फेम विजया बाबर सांगते, "यंदा मी डोंबिवलीच्या शोभायात्रेत सहभागी होऊन नंतर गावी जाणार आहे. आमच्या गावी ग्रामदेवता जानुबाईंची यात्रा असते. गेल्या वर्षी याच जत्रेत असताना मला 'कमळी' मालिकेसाठी कॉल आला होता. आमच्या घरात साताऱ्याची परंपरा असल्याने पुरणपोळी आणि कटाची आमटी याचा खास बेत असतो."

'सनई चौघडे' टीमची सरप्राईज

'सनई चौघडे' मालिकेतील अभिनेत्री मेघना एरंडे म्हणाली, "मी दरवर्षी घरी गुढी उभारते. पण यंदाचा गुढीपाडवा खास 'सनई चौघडे'च्या टीमसोबत साजरा करणार आहोत. आम्ही सर्वजण डोंबिवलीच्या शोभायात्रेत सहभागी होणार आहोत. या नववर्षाचा माझा संकल्प प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आहे. आमच्या घरी सकाळी मी आणि माझ्या सासूबाई मिळून गुढी उभारतो. आमच्या घरात तर महिलाराज आहे!" असं ती म्हणाली.

'सनई चौघडे'मधील जुई गोगरी म्हणाली, "या वर्षीपासून आम्ही घरात गुढी उभारणार आहोत. मी दरवर्षी गिरगावच्या शोभायात्रेला आवर्जून जाते. शोभायात्रेत सर्वजण एकत्र येतात, हे खास असतं. गुढीपाडवा म्हटलं की गोड पदार्थ खाणं आलंच. दरवर्षीप्रमाणे यंदाही मी गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाणार आहे."

झी मराठी कलाकारांचा हा खास प्लॅन पाहता, यंदाचा गुढीपाडवा प्रेक्षक आणि कलाकार यांच्यासाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...