⚡ ब्रेकिंग News

आंबेबन मळा परिसरातील स्ट्रीट लाईटची मागणी पूर्ण; नागरिकांत समाधान

 

आंबेबन मळा परिसरातील स्ट्रीट लाईटची मागणी पूर्ण; नागरिकांत समाधान

आटपाडी, प्रतिनिधी : 

आटपाडी नगरपंचायतीच्या वतीने प्रभाग क्रमांक १४ मधील आंबेबन मळा परिसरात नागरिकांची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली स्ट्रीट लाईट बल्ब बसविण्याची मागणी पूर्ण करण्यात आली. या कामामुळे परिसरात रात्रीच्या वेळी प्रकाशाची व्यवस्था उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सुरक्षिततेत वाढ होऊन दैनंदिन जीवन अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

या कामाची पाहणी आटपाडी नगरपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. यू. टी. जाधव यांनी केली. यावेळी नगरसेवक पै. अजित जाधव, भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष तथा प्रभागातील जागरूक नागरिक बाळासाहेब मेटकरी, प्रवीण क्षीरसागर, सचिन जाधव, बी.डी.एस. बँकेचे शाखाधिकारी प्रशांत डोईफोडे, चंद्रकांत काळे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष यू. टी. जाधव यांनी सांगितले की, "जनतेच्या समस्या सोडविणे आणि मूलभूत सुविधा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे हीच आमची बांधिलकी असून नागरिकांच्या विकासासाठी नगरपंचायत कटिबद्ध आहे."

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...