⚡ ब्रेकिंग News

​खवय्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या 'त्या' हॉटेलला कोणाचा 'आशीर्वाद'? अधिकारी आणि हॉटेल प्रशासनाचे मौन; कारवाई गुलदस्त्यात.



आटपाडीत खळबळ! नामांकित हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; 'लाखोंचा मलिदा' दाबल्याची जोरदार चर्चा!

​खवय्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या 'त्या' हॉटेलला कोणाचा आशीर्वाद? अधिकारी आणि हॉटेल प्रशासनाचे मौन; कारवाई गुलदस्त्यात.

​आटपाडी:

राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज आणि सामान्य खवय्यांचे आवडते ठिकाण असलेल्या आटपाडीतील एका नामांकित हॉटेलवर अन्न व भेसळ प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी (FDA) अचानक धाड टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या धाडीमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या कारवाईनंतर नेमके काय घडले, कोणाला कितीचा 'आशीर्वाद' मिळाला आणि कारवाई का दडपण्यात आली, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

​हॉटेल प्रशासनाचा कानाडोळा, तर अधिकारी 'नॉट रीचेबल'

​मिळालेल्या माहितीनुसार, धाड पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच हॉटेल प्रशासनाने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. "असा कोणताही प्रकार घडलेलाच नाही," असे सांगत हॉटेल मालकांनी ही जबाबदारी पूर्णपणे झटकली आहे.

​दुसरीकडे, या कारवाईची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी आणि काही स्थानिक पत्रकारांनी संबंधित अन्न व भेसळ अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी फोन उचलणे टाळले. अधिकाऱ्यांच्या या संशयास्पद मौनामुळे त्यांनाही 'मलिदाचा चांगलाच आशीर्वाद' मिळाला असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

​या हॉटेलमध्ये मांसाहारी जेवणावर ताव मारणाऱ्या ग्राहकांना नेमकं काय खायला घातलं जात होतं? अन्नात अशी कोणती गंभीर भेसळ किंवा त्रुटी आढळली होती की ज्यामुळे ही कारवाई लपवण्यासाठी लाखोंची उलाढाल झाल्याची चर्चा सुरू आहे? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. जर हॉटेलमध्ये सर्व काही आलबेल होते, तर ही कारवाई अधिकृतपणे जाहीर का करण्यात आली नाही? पैशांच्या जोरावर ग्राहकांच्या आणि खवय्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार या हॉटेलला कोणी दिला, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

​"आटपाडीतील या मोठ्या प्रकरणात सध्या तरी सर्व काही आलबेल आणि गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, पडद्यामागे मोठा 'आशीर्वाद' मिळाला हे मात्र सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे."

​आता जनतेमधून मागणी होत आहे की, हॉटेल प्रशासनाने केवळ कागदोपत्री किंवा अंतर्गत सारवासारव न करता माध्यमांसमोर उघडपणे येऊन आपली बाजू स्पष्ट करावी. तसेच, ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली, त्यांनी तिथे काय आढळले आणि काय कारवाई केली याचा जाहीर खुलासा करावा.

​आटपाडीतील या मोठ्या हॉटेलचे बिंग नेमके कधी फुटणार आणि दोषींवर खरोखर कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...