⚡ ब्रेकिंग News

आटपाडीत खळबळ: बोकडाच्या नावाखाली मोठ्या जनावरांचे मटण विकल्याचा गंभीर आरोप; १० लाखांत प्रकरण दाबल्याची जोरदार चर्चा!


 आटपाडीत खळबळ: बोकडाच्या नावाखाली मोठ्या जनावरांचे मटण विकल्याचा गंभीर आरोप; १० लाखांत प्रकरण दाबल्याची जोरदार चर्चा!

 क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये बोकड अथवा बकरीचे मटण म्हणून ग्राहकांना चक्क मोठ्या जनावरांचे मटण विकल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) एका अधिकाऱ्याने तब्बल १० लाख रुपयांची लाच घेतल्याची चर्चा रंगू लागली असून, यामुळे प्रशासनाच्या एकूणच कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या काळात संबंधित हॉटेलमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत होती. राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात या हॉटेलमध्ये जेवणासाठी येत असत. त्यामुळे 'त्या काळात नागरिकांनी नेमकं कोणतं मटण खाल्लं?' हा प्रश्न आता तालुक्यात चिंतेचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून ग्राहकांची उघड फसवणूक झाल्याचा आरोप केला जात आहे.

​अन्न व औषध प्रशासनाने या संवेदनशील प्रकरणावर आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल जाहीर करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, प्रकरण उघडकीस आल्यानंतरही संबंधित जबाबदार अधिकारी माध्यमांसमोर बोलण्यास तयार नसल्याने नागरिकांमधील संशय अधिकच वाढला आहे. या कथित आर्थिक व्यवहार, मटणाचे नमुने आणि हॉटेलची भूमिका यांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आटपाडीकरांकडून केली जात आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...