पुणे: नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असतानाच पुण्यातून आणखी एका स्वयंघोषित बाबाच्या कुकृत्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'मी महादेवाचा अवतार आहे' असे सांगून महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली ऋषिकेश वैद्य या पाखंडी बाबाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई पिंपरी परिसरातून करण्यात आली. आरोपी गाडीतून आपल्या नातेवाईकांकडे पुण्यात येत असताना पोलिसांना माहिती मिळाली आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. उद्या दुपारी त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा आरोपी ऋषिकेश वैद्य यांच्याशी पहिला संपर्क २०२३ मध्ये फेसबुकद्वारे झाला होता. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये आरोपी पुण्यात आला आणि महिलेला भेटला. त्याने स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे सांगितले आणि तिला आपली 'पार्वती' असल्याचा दावा केला.
पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला पुण्यातील मांजरी भागातील एका लॉजमध्ये नेले. तिथे तिला काही मादक पदार्थ दिले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने महिलेचे फोटोही काढले होते. या प्रकरणी मांजरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वसई येथील गुन्हा पुढील तपासासाठी पुणे पोलिसांकडे वर्ग झाला होता.
अशोक खरात प्रकरणातील नवे खुलासे
दरम्यान, नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात शुक्रवारी रात्री उशीरा दोन नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा आर्थिक फसवणुकीचा आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात खरातने दैवी अवतार असल्याचे सांगून आणि तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या जोडप्याने संसारात विघ्न येत असल्याने खरातकडे मदत मागितली होती.
पुण्यातील या नव्या प्रकरणाने भोंदूबाबा आणि स्वयंघोषित धर्मगुरुंच्या विरुद्ध राज्यभरात संताप वाढला असून, अशा पाखंडी लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.