"व्हिडीओ ऑफिस बॉयकडून बाहेर आले, काही लोक मॉर्फ करून महिलांना बदनाम करताहेत"; नगर-नाशिकमध्ये गुन्हे दाखल, अनेक अकाउंट्स बंद
मुंबई: नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंबाबत नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS) यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
"कोणताही व्हिडीओ पोलिसांकडून व्हायरल झालेला नाही," असे स्पष्ट करत कर्णिक म्हणाले की, हे व्हिडीओ खरातच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉयने काढले होते. त्याच्याकडूनच हे व्हिडीओ बाहेर आले आहेत. ऑफिस बॉयने जीवाच्या भीतीने काही व्हिडीओ लपवून ठेवले होते, नंतर तेही समोर आले.
संदीप कर्णिक यांनी एबीपी माझाच्या 'कॉफी विथ कौशिक' कार्यक्रमात हे विधान केले.
मॉर्फिंगचा धोकादायक प्रकार
कर्णिक यांनी सांगितले की, काही लोक मूळ व्हिडीओ मॉर्फ करून त्यात इतर महिलांचे चेहरे टाकत आहेत. यामुळे अनेक निरपराध महिलांना बदनाम केले जात आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये पोलिस कठोर कारवाई करत आहेत.
गुन्हे आणि कारवाई
व्हायरल व्हिडीओमुळे महिलांची ओळख उघड होत असल्याने त्यांच्या बदनामीच्या प्रकरणी नाशिक आणि नगर जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनेक सोशल मीडिया अकाउंट्सही बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
खरात शातीर गुन्हेगार
संदीप कर्णिक म्हणाले, "अशोक खरात हा शातीर गुन्हेगार आहे. तो अनेक कहाण्या सांगत आहे, पण आम्ही भक्कम पुरावे आणि फॅक्ट्सच्या आधारे त्याला गुन्हे मान्य करण्यास भाग पाडू. पोलिस जलदगतीने तपास करत आहेत आणि आरोपीला योग्य शिक्षा मिळेल."
नरबळीची चर्चा
खरातच्या फार्म हाऊसवर नरबळी आणि प्राण्यांची बळी दिल्याच्या चर्चेबाबत विचारले असता, कर्णिक म्हणाले, "अधिक तपास केल्यानंतरच याबाबतची माहिती समोर येईल."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात भक्कम भूमिका घेतल्याचेही कर्णिक यांनी सांगितले आणि पोलिस तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट केले.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.