⚡ ब्रेकिंग News

भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचाही समावेश; पोलिस अधिकारीही दरबारी हजर.

 भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचाही समावेश; पोलिस अधिकारीही दरबारी हजर.

 करोडो रुपयांचं सोनं, महागड्या गाड्या अन् आलिशान जीवनशैली; अशोक खरातनंतर आणखी एका 'पमी गुरू'चा दबदबा, खासदारांसह पोलिसही दरबारी हजर

ठाणे : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली असतानाच ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात भोंदूगिरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे 'पमी गुरू' नावाच्या तृतीयपंथी गुरूचा दबदबा असून, अंधश्रद्धेला खतपाणी राजकीय मंडळीसह पोलीस अधिकारीही घालत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अंगावर करोडो रुपयांचे सोनं घालून, महागड्या गाड्या आणि आलिशान जीवनशैली दाखवत 'पमी गुरू' रील्स बनवत असल्याचे समोर आले आहेत.

खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा गुरूला भेटायला आल्याचा व्हिडिओ व्हायरल

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर आता पमी गुरूचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मुलं होत नाहीत, नोकरीत अडचणी, कुटुंबात वाद अशा समस्यांनी ग्रस्त असलेल्या अनेक सुशिक्षित महिला महाराष्ट्रातून या गुरूकडे येत असल्याचे व्हिडिओंमध्ये दिसून येते. त्यांच्या आशीर्वादामुळेच मुलं जन्माला आली, असा दावाही काही व्हिडिओंमध्ये करण्यात आला आहे.

मात्र, यापेक्षाही धक्कादायक म्हणजे या गुरूला भेटण्यासाठी पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि राजकीय मंडळीही येत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे देखील या गुरूला भेटायला आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पमी गुरू सोशल मीडियावर करोडो रुपयांचे सोने, महागड्या गाड्या आणि आलिशान जीवनशैली दाखवत रील्स बनवत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पमी गुरूची कोणीही तक्रार करत नाही, त्याच्यापुढे स्थानिक पोलीस नतमस्तक आहेत, अशी परिसरात चर्चा आहे.

पमी गुरूकडे किती गाड्या?

फॉर्च्युनर कार : ४

 थार : ३

 एकूण ७ गाड्या

त्याचबरोबर पमी गुरूकडे मोठ्या प्रमाणावर सोनंही असल्याचे फोटो आणि रील्समधून दिसून येत आहे.

अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ

दरम्यान, नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवून दिली आहे. खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली. बुधवार, १८ मार्च रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून खरात याला ताब्यात घेण्यात आले.

कोण आहे अशोक खरात?

अशोक खरात हा नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीमधून निवृत्त अधिकारी असून, अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. 'शिवनिका ट्रस्ट'च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये २२ वर्षांच्या कारकिर्दीत खरातने १५४ देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्यासाठीच्या उपायांसाठी अशोक खरातच्या संपर्कात असतात.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...