अमरावतीत नराधमांचा थरार; फ्रेजरपुरा परिसरात तरुणीवर सामूहिक अत्याचार, पाच आरोपींना अटक
अमरावती : अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत निर्घृण आणि हादरवणारी घटना घडली आहे. भानखेडा गावाकडे जाणाऱ्या जंगल परिसरात एका तरुणी आणि तिच्या मित्राला अडवून मारहाण करून लुटण्यात आले. त्यानंतर नराधमांनी तरुणीला जंगलात नेून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिचा मित्र अॅक्टिव्हा वाहनाने जात असताना पाच आरोपींनी त्यांना अडवले. आरोपींनी दोघांनाही लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यांच्या जवळील १२० रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली. त्यानंतर एका आरोपीने तरुणीला बाजूला नेून तिच्यावर अत्याचार केला. पीडित तरुणी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.
घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या गंभीर गुन्ह्यात पाचही आरोपींना लवकरच ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पीडिता, साक्षीदार आणि आरोपींची माहिती प्रसारित न करण्याचे आवाहन केले असून, याचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
गोंदियात महामार्गावर भीषण अपघात
दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर एका भीषण अपघातात ४० वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला.
मृतकाचे नाव प्रदीप राऊत (वय ४०, रा. सौंदड) असे आहे. ते महामार्गावरील रेल्वे क्रॉसिंग ओलांडत पायदळ जात असताना मागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात प्रदीप राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
डूग्गीपार पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून, फरार ट्रक चालकाच्या शोधासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.