कोलकाता/दिघा : बंगाली चित्रपट आणि दूरदर्शन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी (वय ४३) यांचा शूटिंगदरम्यान समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना रविवार, २९ मार्च २०२६ रोजी ओडिशातील तलसारी बीच (दिघाजवळ) येथे घडली.
राहुल बॅनर्जी ‘भोले बाबा पार करेगा’ या बंगाली टीव्ही मालिकेच्या शूटिंगसाठी तलसारी बीचवर उपस्थित होते. शूटिंग संपल्यानंतर ते काही अतिरिक्त शॉट्स पूर्ण करण्यासाठी एकटेच समुद्रात उतरले. काही क्षणातच एक मोठी लाट आल्याने ते पाण्यात बुडू लागले. घटनास्थळी उपस्थित क्रू मेंबर्स आणि सहकलाकारांनी तातडीने मदत करत त्यांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. त्यांना दिघा सब-डिव्हिजनल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सहकलाकार भास्कर बॅनर्जी (दिगंत बागची) यांनी सांगितले की, “शूटिंग संपल्यानंतर संपूर्ण टीम जेवणासाठी निघाली होती. राहुलने थांबून काही उरलेले शॉट्स पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. तो एकटाच पाण्यात गेला. अचानक तो बुडत असल्याची आरोळी उठली. आम्ही त्याला बाहेर काढले, पण तोपर्यंत त्याची प्रकृती गंभीर झाली होती.”
पोलिसांनी या प्रकरणी अननॅचरल डेथचा केस दाखल केला आहे. तलसारी मरीन पोलिसांनी सांगितले की, शूटिंगसाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती किंवा पोलिसांना माहिती देण्यात आली नव्हती. सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले नसल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे.
राहुल बॅनर्जी बंगाली चित्रपटसृष्टीत अनेक भूमिकांसाठी ओळखले जात होते. त्यांच्या अकस्मात निधनामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पत्नी प्रियांका सरकार आणि १३ वर्षीय मुलाने या दुःखद घटनेला सामोरे जावे लागले आहे.
सहकलाकार आणि चाहते सोशल मीडियावर राहुल यांच्या आठवणी शेअर करत त्यांच्या आत्म्याला शांतीची प्रार्थना करत आहेत. या घटनेमुळे शूटिंगदरम्यान सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
राहुल अरुणोदय बॅनर्जी यांच्या निधनाने बंगाली मनोरंजन क्षेत्राने एक प्रतिभावान कलाकार गमावला आहे. अधिक तपास सुरू असून, पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर नेमके कारण स्पष्ट होईल.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.