⚡ ब्रेकिंग News

पक्षाची बदनामी रोखण्यासाठी चाकणकरांचा राजीनामा घ्या; राष्ट्रवादी आमदार-नेत्यांची जोरदार मागणी!

पक्षाची बदनामी रोखण्यासाठी चाकणकरांचा राजीनामा घ्या; राष्ट्रवादी आमदार-नेत्यांची जोरदार मागणी!

रुपाली चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा आता सुनेत्रा पवारांच्या कोर्टात! अजित पवार गटातील निम्म्याहून अधिक आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर थेट मागणी केली – “पक्ष वाचवायचा असेल तर चाकणकरांना तत्काळ बाहेर काढा”

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) मोठी खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना खरातशी जवळचे संबंध असल्याच्या आरोपांनंतर आता पक्षातील आमदार आणि नेत्यांकडून त्यांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत निम्म्याहून अधिक आमदार आणि नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की, पक्षाची बदनामी रोखायची असेल तर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेणे गरजेचे आहे. या सर्वांनी ही मागणी थेट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार  यांच्यासमोर मांडली आहे.

सध्या रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुनेत्रा पवार यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. पक्षातील अनेकजणांचे मत आहे की, खरात प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा मोठ्या प्रमाणात बिघडली असून, चाकणकर यांना तत्काळ पदमुक्त केल्याशिवाय पक्षाला पुढे जाता येणार नाही.

खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

अशोक खरात यांच्यासोबत रुपाली चाकणकर यांचे फोटो, पाय धुण्याचे व्हिडिओ आणि इतर बड्या नेत्यांसोबतचे संबंध समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पत्र दिले होते. त्यात त्यांनी “वैयक्तिक कारणास्तव” राजीनामा देत असल्याचे म्हटले होते.

राजीनाम्याच्या पत्रातील मजकूर:

“मी रुपाली निलेश चाकणकर विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा या पत्राद्वारे सादर करत आहे. आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे... तरी आपण माझा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकार करावा.”

आता सर्वांच्या नजरा सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. सुनेत्रा पवार कोणता निर्णय घेतात आणि रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्षपदावरून काढले जाते का, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 


Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...