⚡ ब्रेकिंग News

'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो!' अमोल मिटकरींचा नरेश अरोरांवर टीकेचा बाण; कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे गायब झाले?


'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो!' अमोल मिटकरींचा नरेश अरोरांवर टीकेचा बाण; कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे गायब झाले?

अजित पवारांच्या निधनानंतर 'गुलाबी जॅकेटवाल्या' नेत्याचा ठावठिकाणा नाही; मिटकरी म्हणाले, "सुनेत्रा ताईंच्या शपथविधीलाही आले नाहीत, दु:खात साथ द्यायला हवी होती"

मुबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाचे रणनितीकार आणि 'डिझाईन बॉक्स'चे प्रमुख नरेश अरोरा यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर अरोरा कुठे गायब झाले, याचा शोध घेण्याची गरज असल्याचं म्हणत मिटकरींनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो...' या ओळीचा संदर्भ देत मिटकरींनी सोशल मीडियावरूनच खडे बोल सुनावले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

नरेश अरोरा हे अजित पवार यांच्या जवळचे सल्लागार मानले जात असत. निवडणुकांपासून ते पक्षाच्या रणनीतीपर्यंत सर्व काही तेच सांभाळत होते. अजितदादांना 'गुलाबी जॅकेट' देऊन प्रसिद्धीपटलावर आणण्याचं श्रेयही अरोरा यांनाच दिलं जातं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवून पुष्पगुच्छ देतानाचा त्यांचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावेळी अमोल मिटकरी यांनी त्यांना 'सोल्जर नव्हे, तर सॅलरी सोल्जर' म्हणत टोला लगावला होता.

अरोरा कुठे गायब?

आता अजित पवार यांच्या निधनानंतर मिटकरींनी पुन्हा एकदा अरोरांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "दादांच्या निधनानंतर हे एक-दोन दिवस दिसले, आता कुठे आहेत? सुनेत्रा ताईंच्या शपथविधीलाही ते दिसले नाहीत. आमच्या दु:खात त्यांनी सोबत राहायला हवं होतं. त्यांनी किमान एक पोस्ट तरी टाकायला हवी होती. पण ते कुठे आहेत, याचा शोध महाराष्ट्रानेच घ्यायला हवा." मिटकरी पुढे म्हणाले, "त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना? कदाचित कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे ते गायब झाले असतील."

व्हीएसआर रिपोर्टवरही टीका

अमोल मिटकरी यांनी व्हीएसआर (Vote Share Report) च्या मुद्द्यावरूनही अरोरांवर टीका केली. ते म्हणाले, "जो रिपोर्ट आला, त्यावर काही कन्टेन्ट देण्याची जबाबदारी त्यांची होती. पण ते कुठे आहेत? महाराष्ट्रात आहेत की देशाबाहेर, काहीच माहिती नाही."

सभागृहात चर्चा का नाही?

अजित पवार यांच्या अपघाती निधनावर विधानसभेत अद्याप चर्चा झाली नसल्याबद्दलही मिटकरींनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "आत्ता दोन दिवस आहेत, पुढच्या आठवड्यात सुट्या आहेत. म्हणजे यांना चर्चा घडवून आणायचीच नाही. रोहित पवार प्रयत्न करत आहेत, पण वरिष्ठांनीच पुढाकार घ्यायला हवा."

नेत्यांची नाराजी पत्करूनही केला सवाल

मिटकरी यांना आपल्या या वक्तव्यामुळे पक्षश्रेष्ठींची नाराजी ओढवून घ्यावी लागू शकते, याची जाणीव आहे. ते म्हणाले, "मी बोलल्यावर आमचे नेते मला विचारतील की तू असा का बोलतोयस? ते नाराज होतील. पण त्यांचा मला फोन येत नाही, मीही करत नाही. पण प्रश्न विचारायलाच हवा."

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...