⚡ ब्रेकिंग News

'धुरंधर 2'च्या तिकिटांचे दर पाहून डोळे फिरणार! मुंबई-दिल्लीत रेक्लायनर सीटसाठी तब्बल 3100 रुपये, तरीही शो सोल्ड आऊट



'धुरंधर 2'च्या तिकिटांचे दर पाहून डोळे फिरणार! मुंबई-दिल्लीत रेक्लायनर सीटसाठी तब्बल 3100 रुपये, तरीही शो सोल्ड आऊट

प्रीव्ह्यू शोसाठी तिकिटांचा मोठा खेळ; रिलीजच्या आठ दिवस आधीच 3 लाख तिकिटे विकली, बॉक्स ऑफिसवर 15 कोटींची कमाई

मुंबई: रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर 2' (Dhurandhar: The Revenge) प्रदर्शित व्हायला अजून आठवडाभर बाकी आहे; मात्र चित्रपटाच्या पेड प्रीव्ह्यू शोनेच बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. तिकिटांचे दर आकाशाला भिडले असूनही देशभरातील अनेक शो आधीच हाऊसफुल झाले आहेत. मुंबई आणि दिल्लीतील मल्टिप्लेक्समध्ये रेक्लायनर सीटसाठी तब्बल 3100 रुपयांपर्यंत दर ठरविण्यात आले आहेत, तरीही प्रेक्षकांची गर्दी ओसरलेली नाही.

तिकिटांचे दर वाचून व्हाट लागेल!

'धुरंधर 2'च्या 18 मार्च रोजी होणाऱ्या पेड प्रीव्ह्यू शोसाठी तिकिटांचे दर प्रचंड वाढविण्यात आले आहेत. मेट्रो शहरांमध्ये साध्या फॉरमॅटच्या तिकिटांची किंमत 600 ते 900 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर IMAX थ्रीडी शोसाठी हा दर 1000 रुपयांच्या पुढे गेला आहे. मात्र लक्झरीची परिभाषाच बदलली आहे ती रेक्लायनर सीट्सनी. मुंबईतील बोरिवली येथील INOX मेगाप्लेक्समध्ये रेक्लायनर सीटसाठी तब्बल 3100 रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीतील पीव्हीआर सेलेक्ट सिटी वॉकमध्येही या सीट्सची किंमत 2400 रुपयांवर पोहोचली आहे.

अॅडव्हान्स बुकिंगने केला कोटींचा खेळ

इतके आकाशाला भिडलेले दर असूनही चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. रिलीजच्या आठ दिवस आधीच जवळपास 3 लाख तिकिटे विकली गेली असून, भारतात आतापर्यंत 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, ही कमाई 25 कोटींचा पॅन-इंडिया रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. 'धुरंधर 2' बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या प्रीमियर चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

पहिला भाग सुपरहिट, अपेक्षा शतप्रतिशत

आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत पुनरागमन करत आहे. याशिवाय आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, डॅनिश पंडोर, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'धुरंधर'च्या पहिल्या भागाने जगभरात 1300 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे 'धुरंधर 2' कडून बॉक्स ऑफिसवर नवे इतिहास रचले जाण्याची शक्यता आहे. चित्रपट 19 मार्च रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...