⚡ ब्रेकिंग News

'शेपूट घातली, चिरडून मारताहेत'; अनिल परब यांच्या टीकेने शिंदे सेनेच्या सातारच्या जखमेवर मीठ चोळलं, उदय सामंत-शंभूराज देसाईंचा जोरदार पलटवार


 'शेपूट घातली, चिरडून मारताहेत'; अनिल परब यांच्या टीकेने शिंदे सेनेच्या सातारच्या जखमेवर मीठ चोळलं, उदय सामंत-शंभूराज देसाईंचा जोरदार पलटवार

परब म्हणाले, "भाजपसमोर शेपटी घालून बसलात"; सामंत म्हणाले, "शेपटी घालण्याच्या गोष्टी आम्हाला शिकवू नका"; देसाई म्हणाले, "आमच्या धाडसाला डिवचू नका"

मुंबई: सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या घडामोडींवरून शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील वैचारिक संघर्ष पुन्हा एकदा तापला आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर टीका करताना शिंदे गटाच्या सातारच्या जखमेवर मीठ चोळले. त्यावर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांनी जोरदार पलटवार केला.

विधानसभेत बोलताना अनिल परब म्हणाले, "सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ताधारी मंत्र्यांना पोलिसांनी मारहाण केली. सत्ताधारी मंत्री पोलिसांचा मार खात आहेत. जर या राज्यात मंत्री मार खात असतील, कार्यकर्ते मार खात असतील, तर सर्वसाधारण नागरिकाला सरकार काय संरक्षण देणार? तुम्ही उठाव कशासाठी केला? आमचा स्वाभिमान राष्ट्रवादी चिरडते आहे, आम्ही वाघाचे बच्चे आहोत, असे म्हणायचे. पण आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिरडून काढतो आणि तुम्ही भाजपचं नाव घ्यायलाही घाबरताय."

"कुठे गेली बंडखोरी वृत्ती?"

परब यांनी पुढे टीका करताना विचारले, "पोलीस मारतो तुम्हाला आणि तुम्ही मुग गिळून गप्प बसताय. कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेली तुमची बंडखोरी वृत्ती? स्वतःला वाघ समजतायत, हे वाघ आता कुठे गेले? शेपटी घालून बसलेले आहेत. का फक्त शिवसेनेबरोबर दादागिरी करायची आणि भाजपसमोर शेपटी घालायची? हे या सभागृहात मी कधी बघितलं नव्हतं." त्यांनी शिंदे गटाला आव्हान देत सांगितले की, "आज जर तुम्ही राजीनामा दिलात आणि सत्तेतून बाहेर पडलात, तर आम्ही तुम्हाला भगतसिंगच्या जागी बघू. काय हिंमत आहे तुमची सत्ता सोडण्याची?"

भोंदू बाबांवरूनही निशाणा

परब यांनी भोंदू बाबांच्या मुद्द्यावरूनही सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "भोंदू बाबा महाराष्ट्राला कसा फसवतोय, राजकारणी लोक त्याच्या नादाला कसे लागले आहेत. त्याने लैंगिक अत्याचार केले, गरिबांच्या जमिनी लाटल्या. यामध्ये राजकीय नेत्यांचे फोटो आहेत, याबद्दल दुमत नाही. पण त्याच्याशी आर्थिक संबंध, हितसंबंध, दुष्कृत्यात सहभाग, फोनवर दबाव या सगळ्या गोष्टींना आमचा विरोध आहे."

शिंदे गटाचा पलटवार: "शेपटी घालण्याच्या गोष्टी शिकवू नका"

अनिल परब यांच्या टीकेचा समाचार घेताना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "अनिल परब यांनी शेपटी घातली असा उल्लेख केला. ज्यावेळी आम्ही मुंबईत उठाव करून आलो, त्यावेळी आमचे कोथळे काढणार होते, त्याला आम्ही घाबरलो नाही. हे आम्हाला वरळीवरून यायला देणार नव्हते. शेपटी घालण्याच्या गोष्टी यांनी आम्हाला शिकवू नयेत."

शंभूराज देसाई यांनीही सामंत यांच्या भावनेलाच दुजोरा दिला. ते म्हणाले, "उठाव करताना सुद्धा काय वाक्य वापरली होती? 'यांची प्रेतं येतील, कोथळे काढू', पण खुलेआम आलो. ना आम्ही विमानाने आलो, उतरलो, बसने आलो, विधानभवनला गेलो. त्यामुळे आमच्या धाडसाचं विनाकारण तुम्ही आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका." उदय सामंत यांनी निष्कर्षात म्हटले की, "आम्ही न्याय मागितलेला आहे. आमच्या मंत्री महोदयांनी तुमच्याकडे दाद मागितलेली आहे. हा राजकीय संस्कार आहे आणि ज्यांना संस्कार नाही ते असं बोलतात."


Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...