फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांचा मोठा खुलासा; इराणमध्ये खळबळ, अमेरिकेचा मास्टरप्लॅन काय? नवे नेते वॉशिंग्टनशी बोलणी करण्यास तयार, ट्रम्प यांची 'हिरवी' परवानगी
क्रांती न्यूज बातमी:
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला आहे. इस्रायल-अमेरिकेच्या संयुक्त लष्करी कारवाईत इराणचे ४८ वरिष्ठ नेते ठार झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, "कुणालाही विश्वास बसणार नाही, पण आम्ही एकाच फटक्यात इराणच्या ४८ नेत्यांचा खात्मा केला आहे."
या लष्करी मोहिमेचं वर्णन करताना ट्रम्प यांनी तिला 'अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने आणि यशस्वीरीत्या पुढे जाणारी कारवाई' असं संबोधलं. इराणमधील अमेरिकेचं लष्करी अभियान ठरलेल्या वेळेपेक्षा वेगानं पुढे जात असून ते प्रभावीपणे सुरू असल्याचंही ते म्हणाले.
नव्या नेतृत्वाची चर्चेची तयारी
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. इराणच्या नव्या नेतृत्वानं वॉशिंग्टनसोबत चर्चेची इच्छा व्यक्त केली असून आपण त्यासाठी सहमती दिल्याचं त्यांनी 'द अटलांटिक'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
ट्रम्प पुढे म्हणाले, "इराणने हे आधीच करायला हवं होतं. ते अमेरिकेसोबत करार करू शकले असते, पण त्यांनी चलाखी केली. सध्या तिथले सर्वसामान्य लोक रस्त्यावर आनंद व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे आमचे बॉम्बहल्लेही सुरू आहेत. आम्हाला योग्य वाटेल तोपर्यंत ही कारवाई सुरूच ठेवू."
खामेनी यांच्या हत्येनंतर वाढलेला तणाव
अमेरिका-इस्रायल हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचला आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतरची ही इराणसाठी सर्वात मोठी घटना मानली जात आहे.
यापूर्वी ट्रम्प यांनी खामेनी यांच्या नेतृत्वाखालील शासनाला 'इतिहासातील सर्वात हिंसक शासनांपैकी एक' असं संबोधलं होतं. अमेरिका ही कारवाई फक्त स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी करत असल्याचा दावा त्यांनी केला होता.
दरम्यान, इराणच्या नव्या नेतृत्वानं अमेरिकेशी चर्चेची तयारी दर्शवल्यानं आता मध्यपूर्वेचं राजकारण कसं आकार घेतं, याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.
.jpeg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.