⚡ ब्रेकिंग News

खामेनींच्या हत्येनंतर इराणचा नवा अंतरिम सर्वोच्च नेता कोण? धर्मगुरू अली रेजा अराफी यांच्याकडे सत्तेची सूत्रे



अमेरिका-इस्रायल हल्ल्यात अयातोल्ला खामेनी यांचा मृत्यू; मदरसा व्यवस्थेप्रमुख अराफी यांच्याकडे अंतरिम नेतृत्व; ट्रम्प यांचा इराणला इशारा - 'शस्त्रे खाली ठेवा, नाहीतर कठोर कारवाई सुरूच राहील.'

क्रांती न्यूज बातमी:

अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर आता नव्या नेतृत्वाच्या हाती सत्ता सोपवण्यात आली आहे. खामेनी यांच्या निधनानंतर इराणने वरिष्ठ धर्मगुरू अयातोल्लाह अली रेजा अराफी यांची अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली आहे. इराणच्या संविधानानुसार, नव्या सर्वोच्च नेत्याची निवड होईपर्यंत अंतरिम नेतृत्व परिषद देशाची जबाबदारी सांभाळणार आहे.

कोण आहेत अली रेजा अराफी? 

६७ वर्षीय अली रेजा अराफी यांचा जन्म १९५९ मध्ये झाला. ते सध्या ‘असेंब्ली ऑफ एक्स्पर्ट्स’चे उपाध्यक्ष आहेत. २०२९ मध्ये ते ‘गार्डियन कौन्सिल’चे सदस्य होते. ही संस्था निवडणूक उमेदवारांची छाननी आणि संसदेत मंजूर कायद्यांचे पुनरावलोकन करते. अराफी हे देशातील इस्लामी मदरसा व्यवस्थेचे प्रमुख मानले जातात. त्यांनी ‘अल-मुस्तफा आंतरराष्ट्रीय विद्यापीठा’चे नेतृत्वही केले असून तेथे देश-विदेशातील धर्मगुरूंना प्रशिक्षण दिले जाते.

अंतरिम नेतृत्व परिषद कशी काम करते? 

इराणच्या संविधानानुसार, सर्वोच्च नेत्याच्या निधनानंतर राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश आणि गार्डियन कौन्सिलमधील एक धर्मगुरू यांचा समावेश असलेली परिषद तात्पुरती सत्ता सांभाळते. ही परिषद महत्त्वाचे धोरणात्मक आणि लष्करी निर्णय घेते. मात्र, अंतिम निर्णय ८८ सदस्यीय ‘असेंब्ली ऑफ एक्स्पर्ट्स’ घेते, ज्यांच्याकडे देशाच्या राजकीय आणि लष्करी व्यवस्थेवर सर्वोच्च अधिकार आहेत.

खामेनी यांच्या मृत्यूनंतर वाढलेला तणाव 

खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये ४० दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली आहे. इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचाही मृत्यू झाला आहे. तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून या हल्ल्याचा बदला घेण्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

ट्रम्प यांचा इशारा 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धचे लष्करी अभियान सुरूच राहील, असं स्पष्ट केलं आहे. शांतता प्रस्थापित होईपर्यंत अचूक आणि तीव्र बॉमबहल्ले सुरू राहतील, असं ते म्हणाले. तसंच इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स', सशस्त्र सेना आणि पोलिस दलाला शस्त्रं खाली ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली असून जागतिक राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...