“काहीजणांना रणांगणात भेटू... काहींना इथेच भेटलात म्हणून हात जोडतात” उद्धव ठाकरेंचा शाब्दिक प्रहार; विधानपरिषदेत राजकीय कोपरखळ्यांचा वर्षाव
मुंबई : विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ संपल्याच्या निमित्ताने काल सभागृहात राजकीय निरोप समारंभ पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दिक फटकेबाजी पाहायला मिळाली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘उद्धव ठाकरे साहेब’ असा करत त्यांना निरोगी आयुष्य आणि राजकीय आयुष्यास शुभेच्छा दिल्या. शिंदे म्हणाले, “काहीजण सभागृहात पुन्हा भेटतील, तर काहीजण रणांगणात (फिल्डवर) भेटतील.”
यावेळी उद्धव ठाकरे सुरुवातीला सभागृहात उपस्थित नव्हते. मात्र शिंदेंचं भाषण संपत असताना ते हजर झाले.
उद्धव ठाकरेंचा मिश्किल टोला
आपल्या निरोपाच्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले,
“मुख्यमंत्रीजी, मी सभागृहात आलो तेव्हा तुमच्या आधी काहीजण बोलत होते कुठेतरी भेटू मी तुम्हाला (देवेंद्र फडणवीस) थोड्यावेळाने भेटायला येणार आहे. पण काहीजणांना रणांगणात भेटू, काहींना इथे भेटलात म्हणून हात जोडतात अशी काही लोक आहेत. असो
या वाक्यातून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला, ज्यामुळे सभागृहात हलकासा हशा पसरला.
निरोप घेणारे ९ आमदार
1. उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा)
2. नीलम गोऱ्हे (शिवसेना)
3. शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट)
4. अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट)
5. गोपीचंद पडळकर (भाजप)
6. रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
7. राजेश राठोड (काँग्रेस)
8. प्रवीण दटके (भाजप)
9. रमेश कराड (भाजप)
दरम्यान, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या सर्व आरोपांना उत्तर देणार आहेत. यानंतर मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची पत्रकार परिषदही होणार आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.