⚡ ब्रेकिंग News

दुबईत अडकलेल्या भारतीयांसाठी सोनू सूद पुन्हा मदतीला धावला! मोफत राहण्याची व्यवस्था करणार; व्हिडिओ व्हायरल

 


 दुबईत अडकलेल्या भारतीयांसाठी सोनू सूद पुन्हा मदतीला धावला! मोफत राहण्याची व्यवस्था करणार; व्हिडिओ व्हायरल

 इराण-अमेरिका युद्धामुळे हवाई वाहतूक विस्कळीत, अनेक प्रवासी अडकले; सोनू म्हणाला- "हे फक्त माणुसकीचं नातं आहे"

इराण-अमेरिका युद्धामुळे संपूर्ण मध्यपूर्वेतील हवाई वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकून पडले आहेत. अशा कठीण काळात बॉलिवूड अभिनेते सोनू सूद पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आले आहेत. दुबईत अडकलेल्या सर्व नागरिकांसाठी त्यांनी मोफत राहण्याची व्यवस्था करण्याची घोषणा केली आहे.

सोनू सूदचा व्हायरल व्हिडिओ:

सोनू सूदने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे, "सर्वांना नमस्कार. जे कोणी लोक सध्या सुरू असलेल्या अडचणींमुळे दुबईमध्ये अडकले असतील त्यांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे, की तुम्हाला राहण्यासाठी जागा आहे. आम्ही तुमची मोफत राहण्याची सोय करत आहोत."

कोणीही संपर्क साधू शकतो:

अभिनेत्याने पुढे माहिती दिली की, भारतीय किंवा कोणतेही नागरिकत्व असलेले लोक जे दुबईत अडकले आहेत, त्यांनी इंस्टाग्रामवर @sonu_sood किंवा @dugastaproperties ला डीएम करावे. "तुम्ही तुमच्या मायदेशी परत जाईपर्यंत तुमची मोफत राहण्याची सगळी व्यवस्था आम्ही करू," असे आश्वासन सोनूने दिले.

माणुसकीचं नातं:

सोनू सूद म्हणाला, "यासाठी कोणतेही राष्ट्रीयत्व असण्याची गरज नाही. कोणत्याही अटी नाहीत. ही फक्त माणुसकी आहे. मदत हवी असल्यास आम्हाला इंस्टाग्रामवर डीएम करा. ही पोस्ट शक्य तितकी शेअर करा जेणेकरून ती गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल."

पार्श्वभूमी:

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत 5 हजारांहून अधिक बॉम्ब इराणवर टाकण्यात आले आहेत. इराणच्या 20 युद्धनौका उध्वस्त झाल्या असून हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या संघर्षाचा परिणाम म्हणून दुबईतील काही ठिकाणीही हल्ले झाले असून अनेक विमाने रद्द झाल्याने शेकडो भारतीय नागरिक तेथे अडकून पडले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांसाठी केलेल्या मदतीमुळे 'रियल हिरो' म्हणून ओळखले जाणारे सोनू सूद यांनी पुन्हा एकदा मानवतेचं उत्तम उदाहरण समोर ठेवलं आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...