⚡ ब्रेकिंग News

सोलापुरात भाजपचा जल्लोष: 11 पैकी 10 पंचायत समित्यांवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला


  सोलापुरात भाजपचा जल्लोष: 11 पैकी 10 पंचायत समित्यांवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला

 दिवंगत गणपतराव देशमुख यांचा 'अभेद्य गड' फोडत भाजप-शिंदे सेनेची सांगोल्यात ऐतिहासिक कामगिरी; माळशिरस वगळता जिल्हाभरात भाजपचे वर्चस्व

सोलापूर: जिल्हा परिषद पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत यश मिळवत जिल्ह्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिल्ह्यातील 11 पैकि तब्बल 10 पंचायत समित्यांवर आपले सभापती बसवून मोठा राजकीय डंका पिटला आहे. केवळ माळशिरस पंचायत समिती वगळता उर्वरित सर्व ठिकाणी भाजपने आपला झेंडा फडकवला.

सर्वात मोठा राजकीय भूकंप घडवून आणण्यात आला तो सांगोला पंचायत समितीमध्ये. दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या रुपाने शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) 55 वर्षे अभेद्य राखलेला सांगोल्याचा गड यावेळी भाजपने उद्ध्वस्त केला. शेकापसोबत निवडून आलेल्या दीपक साळुंखे पाटील गटातील तीन पंचायत समिती सदस्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलली. या ऐतिहासिक विजयानंतर सांगोल्यात ज्येष्ठ नेते शहाजीबापू पाटील, दीपक आबा साळुंखे आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोषात आनंद साजरा केला. सांगोला पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या पुनम इंगवले तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) चे अजय सरगर यांची बिनविरोध निवड झाली.

तर पंढरपूर पंचायत समितीमध्ये सत्ताधारी-विरोधक पुर्वस्थितीत समसमान असताना राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या आमदार प्रमोद हरी देशमुख यांनी पक्षाचा व्हीप झुगारून भाजपला पाठिंबा दिला. परिणामी, 9 विरुद्ध 7 अशा मतांनी भाजपचे डॉ. शुभम आगलावे यांनी सभापतीपदावर विजय मिळवला. उपसभापतीपद राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे प्रमोद देशमुख यांना मिळाले.

मात्र, मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या माळशिरसमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला. येथे महायुतीतीलच शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी महाविकास आघाडीच्या साथीने भाजपला रोखले. येथे शिंदे सेनेचे दत्ता मगर सभापती तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या मनीषा पाटील या उपसभापती झाल्या.

महाविकास आघाडीचा प्रयोग फसलेल्या बार्शी पंचायत समितीतही भाजपने सरशी केली. येथे मिनाक्षी रोंगे सभापती तर संतोष निंबाळकर उपसभापती म्हणून निवडून आले. या निवडीनंतर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...