कलियुगी घटना! कारल्याच्या भाजीवरून संताप; मुलानेच आईला जीवे मारले
चंद्रपूर: जेवणात कारल्याची भाजी का बनवली, या क्षुल्लक कारणावरून संतापाच्या भरात एका मुलाने आपल्या वृद्ध आईची निर्घृण हत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात उघडकीस आली आहे.
ही घटना मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे गुरुवारी (१९ फेब्रुवारी) रात्री घडली. ६५ वर्षीय सुमित्रा पेटकुले असे मृत महिलेचे नाव असून, तिचा ३५ वर्षीय मुलगा जगदीश दशरथ पेटकुले याला पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित्रा यांनी गुरुवारी रात्री जेवणासाठी कारल्याची भाजी बनवली होती. मुलगा जगदीशने घरी आल्यानंतर कारल्याची भाजी बनवल्याबद्दल आईवर तोंडसुख घातले. यातून सुरू झालेल्या वादात रागाच्या भरात त्याने आईला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीत सुमित्रा यांचा जागीच मृत्यू झाला.
दारूच्या नशेतून घडले कृत्य
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी जगदीशला दारूचे व्यसन असल्याचे समोर आले आहे. घटनेच्या वेळीही तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या सवयीमुळे घरगुती कलह वाढत असल्याने दोन महिन्यांपूर्वीच त्याची पत्नी मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. त्यानंतर तो एकटाच आईसोबत राहत होता.
या घटनेची माहिती गावकऱ्यांनी देताच मूल पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी जगदीश याला ताब्यात घेण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
.jpeg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.