‘रुबाब’: रक्तपाताच्या अट्टहासापेक्षा समजुतीच्या माणुसकीवर भाष्य करणारा चित्रपट
इरफान खानचा ‘जज्बा’मधील एक प्रसिद्ध संवाद आहे— ‘महोब्बत है इसलिए जाने दिया, जिद होती तो बाहों में होती!’ ही ओळ प्रेम आणि अहंकार, तसेच मोकळेपणा आणि मालकीहक्क यातील सीमारेषा अधोरेखित करते. पडद्यावर प्रेमासाठी जीव देणारे किंवा घेणारे ‘ग्लोरिफाय’ केलेले अनेक नायक आपण पाहिले, पण वास्तव आयुष्यात जेव्हा प्रेमाभोवती वादळ निर्माण होतं, तेव्हा त्याचे उत्तर केवळ ‘रक्तपात’च असू शकतं का? स्वतःला संपवणं किंवा दुसऱ्याचा जीव घेणं, या टोकाच्या उत्तरांना छेद देणारी एक संवेदनशील कथा दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनी ‘रुबाब’ चित्रपटातून मांडली आहे.
‘रेखा’ या लघुपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर, रणखांबे यांनी आपल्या पहिल्या पूर्ण लांबीच्या सिनेमासाठी मातीतील गोष्ट निवडली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही प्रेमकहाणी वरवर साधी वाटत असली, तरी ती लेखणीतील ‘संयम’ आणि ‘माणुसकी’मुळे वेगळी ठरते.
खास बाब म्हणजे इथं नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण माणदेश ज्याला आपण दुष्काळी भाग म्हणतो त्या भागामध्ये म्हणजे आटपाडी आणि शेटफळे या परिसरामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेलं आहे. विशेष महत्वाची म्हणजे या चित्रपटातील लीड करणाऱ्या दोन्ही कलाकारांनी माणदेशी ढंगाची भाषा त्याचा लहेजा जपण्याच्या खुप चांगला प्रयत्न केला आहे.
माणदेश हा रांगडी भाषेसाठी प्रसिद्ध आहे. त्या मातीशी ईमान राखणारा हा चित्रपट आहे. एक महत्वाचे वैशिष्ठ म्हणजे या चित्रपटासोबत एका व्यक्तीचा उल्लेख करणे गरजेचे आहे, ते म्हणजे शेटफळे गावचे विजय देवकर यांच्या मुळेच या चित्रपटाचे चित्रीकरण या भागात झाले. तसा नामोल्लेख सुध्दा दिपक रनखांबे यांनी वारंवार केला आहे.
म्युझिकल ट्रीट: प्रेमाची ही गोष्ट गाणी आणि संगीताच्या माध्यमातून सुंदर गुंफली आहे.
व्यावसायिक बाज: यात नाच-गाणी, नाट्य, सूड, अॅक्शन आणि ‘स्लोमोशन’चा वापर करत चित्रपटाला व्यावसायिक रूप देण्यात आले आहे.
वेगळी दृष्टी: प्रेम म्हणजे केवळ अट्टहास नसून ती एक समजूतदार प्रक्रिया आहे, हे दिग्दर्शकाने प्रभावीपणे मांडले आहे.
थोडक्यात, ‘रुबाब’ हा केवळ एक चित्रपट नसून तो प्रेम प्रकरणातील हिंसाचाराला नाकारून माणुसकीच्या वाटेने जाणारा एक संयमी प्रवास आहे.
.jpeg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.