⚡ ब्रेकिंग News

दोन चार गद्दार फोडल्यानं शिवसेना संपत नसते'; कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या, तरी शिवसेना संपवू शकत नाही – उद्धव ठाकरे

नागपूर विमानतळावर शिवसैनिकांना संबोधित; यवतमाळसह ६ मतदारसंघाच्या दौऱ्याला सुरुवात; 'पलटवार होणार, फितूरांना उत्तर देणार'

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सहा खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने आज (२७ जून) उद्धव ठाकरे नागपूर मध्ये दाखल झाले. नागपूर विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी स्वागताला पोहोचलेल्या शिवसैनिकांना थोडा वेळ संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांना स्पष्ट इशारा दिला.

 'दोन चार गद्दार फोडल्यानं शिवसेना संपत नसते'

विमानतळावर शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "शिवसेना हे प्रकरण विरोधकांना कळलेलं नाही. ते त्यांच्या कळण्याच्या पलीकडील आहे. दोन चार गद्दार फोडले तर शिवसेना संपून जाईल, असं त्यांना वाटतं."

ते पुढे म्हणाले, "पण असे अनेक गद्दार आमच्यातून निघून गेले, तरी जोपर्यंत तुमच्यासारखे कट्टर, कडवट, निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, तोपर्यंत शिवसेना कोणाच्या कितीही पिढी उतरल्या तरी संपणार नाही आणि संपवू शकत नाही."

 'जिथं उभं राहतो ते मैदान ओसंडून वाहतं'

उद्धव ठाकरे म्हणाले, "आज मी यवतमाळला चाललो आहे. पण आज तुम्हाला शब्द देतो – पुढे मी नागपुरात आल्याशिवाय राहणार नाही. नागपुरात आल्यावर एक शिवसैनिकांचा मेळावा घेऊ."

त्यांनी आठवण सांगताना म्हटले, "काही वर्षांपूर्वी कस्तुरचंद पार्कमध्ये सभा घेतली होती, तेव्हा तिथली गर्दी ओसंडून वाहत होती. अनेकांनी आम्हाला सांगितलं होतं की मैदान चुकलंय. मात्र, आम्ही जिथं उभं राहतो ते मैदान ओसंडून वाहतं."

 'पुढच्या महिन्यात शिवसैनिकांचा मेळावा घेऊ'

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "आता तेवढा मोठा मैदान सरकारने नागपूरला शिल्लक ठेवला असेल, तर मी त्या मैदानात येणार आणि सभा घेणार आहे. पाऊस सुरू होत आहे, मला कल्पना आहे. पुढच्या महिन्यात शिवसैनिकांचा प्रचंड मेळावा घेऊयात. मी त्या मेळाव्याला येतो."

"तुमच्या प्रेमामुळे शिवसेना आहे आणि शिवसेना राहील. आणि जे जे शिवसेनेच्या मुळावर येतील, त्यांना संपवल्याशिवाय तुम्ही थांबणार नाही, हा मला विश्वास आहे," असेही ते म्हणाले.

 सहा मतदारसंघांचा दौरा

उद्धव ठाकरे आजपासून २७ ते २९ जून या तीन दिवसांच्या कालावधीत बंडखोर खासदारांच्या सहा मतदारसंघात दौरा करणार आहेत:

यवतमाळ-वाशिम (संजय देशमुख)

नांदेड-हिंगोली (नागेश पाटील आष्टीकर)

परभणी (संजय जाधव)

धाराशिव (ओमराजे निंबाळकर)

शिर्डी (भाऊसाहेब वाकचौरे)

या दौऱ्यात ते शिवसैनिक आणि मतदारांशी संवाद साधणार आहेत.

 'पलटवार होणार, फितूरांना उत्तर देणार'

दरम्यान, ठाकरे गटाकडून एक नवा ट्रेलर जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे, "आता पलटवार होणार, फितूरांच्या फितूरीला उत्तर देणार, निष्ठेची ताकद पुन्हा दाखवणार!"

हा ट्रेलर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करण्यापूर्वी प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गटाकडून मोठी राजकीय हालचाल होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांनी नागपूर विमानतळावर शिवसैनिकांना संबोधित करताना 'दोन चार गद्दार फोडल्यानं शिवसेना संपत नसते' असे स्पष्ट केले. विरोधकांच्या कितीही पिढ्या शिवसेना संपवण्यासाठी उतरल्या तरी ते शक्य नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढच्या महिन्यात नागपूरमध्ये शिवसैनिकांचा प्रचंड मेळावा घेण्याची घोषणाही केली. सहा मतदारसंघाच्या दौऱ्याला सुरुवात करत त्यांनी 'पलटवार' आणि फितूरांना उत्तर' देण्याचे संकेत दिले आहेत. आता या दौऱ्याचे परिणाम आणि ठाकरे गटाची पुढील रणनीती कशी असते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...