क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
आटपाडी शहरातील साठेनगर परिसरातील गोरगरीब, उपेक्षित व वंचित घटकांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळावा, मालकी हक्क 7/12 व प्रॉपर्टी कार्ड द्यावे . तसेच जाचक अटी रद्द करून २०११ पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करावीत .अशी मागणी साठेनगर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले की, औंध संस्थान काळापासून साठेनगरमध्ये अनेक कुटुंबे वास्तव्यास असूनही जागा शासनाच्या नावावर असल्यामुळे आजपर्यंत अनेक पात्र नागरिक घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. गत आठवडाभर साठेनगर मधील नागरिकांची सह्यांची प्रभावी मोहीम राबवण्यात आली . त्यामुळे २०११ पूर्वीच्या १५०० चौ. फूटपर्यंतच्या जागेवरील घरांचे नियमितीकरण करण्याच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून सर्व पात्र नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा.
यावेळी युवा नेते नाथा लांडगे, माजी ग्रा पं सदस्य प्रदीप लांडगे, विष्णू लांडगे सर, बबन लांडगे, अशोक लांडगे, प्रेम नाईकनवरे , संजय लांडगे मिस्त्री , दुर्गेश लांडगे, रोहित लांडगे, सुनील लोखंडे, संजय वाघमारे यांच्यासह साठेनगरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष यु. टी. जाधव व गटनेते नगरसेवक ऋषिकेश देशमुख यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले.
यावेळी नगराध्यक्ष यु. टी. जाधव यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रशासनाच्या वतीने आटपाडी शहरातील या योजनेस पात्र ठरणाऱ्या सर्व नागरिकांसाठी जनता दरबार आयोजित करण्यात येणार असून, जास्तीत जास्त पात्र नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.