'उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे वराती मागून घोडं नाचवण्याचा प्रकार'; सहा खासदारांची वरात निघून गेली, आता 'हे घोडे आणि शिंगरू' फिरत आहेत
क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
धाराशिव :शिवसेना (शिंदे गट) च्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी एका कार्यक्रमात अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना प्रभू श्रीरामाची उपमा देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लक्ष्मणाची उपमा दिली आहे . तर उद्धव ठाकरे यांना रावण आणि संजय राऊत यांना कैकयी अशी संबोधले आहे.
ज्योती वाघमारे म्हणाल्या, "श्रीराम म्हणजे एकनाथ शिंदे आणि लक्ष्मण म्हणजे देवेंद्र फडणवीस. राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ आहे." सहा खासदार शिंदे गटात आल्यानंतर राज्यात मोठा पक्ष कोणता, अशी चर्चा सुरू झाली होती. या अनुषंगाने वाघमारे यांनी हे विधान केले आहे. सेना-भाजपामध्ये मोठ्या पक्षावरून सुरू असलेला सुप्त वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांना रावण आणि संजय राऊत यांना कैकयी अशी उपमा देत टीका केली. त्या म्हणाल्या, "उद्धव ठाकरे यांचा दौरा म्हणजे वराती मागून घोडं नाचवण्याचा प्रकार आहे. सहा खासदारांची वरात निघून गेली, आता हे घोडे आणि शिंगरू चौकशा करत राज्यभर फिरत आहेत. त्याचा काहीच उपयोग होणार नाही."
त्या पुढे म्हणाल्या, "हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे कल्पवृक्ष होते. त्यांची मुलं ही त्यावरील बांडगुळं आहेत. उद्धव ठाकरे हे त्याच बांडगुळासारखे आहेत का, हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा."
संजय राऊत यांच्यावर टीका करताना वाघमारे म्हणाल्या, "संजय राऊत रोज शिवीगाळ करणारा तो गांडूळ आहे. गांडुळाचा उपयोग शेतीमाती सुपीक करायला होत असला, तरी संजय राऊत यांचा उपयोग मात्र ठाकरे गट नापीक करायचं काम करतोय."
त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर टीका करताना म्हटले, "हेच तुम्ही योग्य वेळेवर केला असता तर त्याचा उपयोग झाला असता."
दुसरीकडे, परळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं स्वागत केले.
उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जेसीबी तून फुलांची उधळण केली. शिवसैनिकांबरोबरच परळीकरांनी मोठी गर्दी केली. यावेळी परळीतल्या नागरिकांकडून ज्योतिर्लिंग वैजनाथाची प्रेम देखील उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहे.
ज्योती वाघमारे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना आणि भाजपमधील मोठ्या पक्षाच्या वादाला या वक्तव्याने आणखी तीव्रता आली आहे. उद्धव ठाकरे यांना रावण आणि संजय राऊत यांना कैकयी म्हणण्याचा विरोधकांकडून निषेध होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदे यांना राम, देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्मण, उद्धव ठाकरे यांना रावण आणि संजय राऊत यांना कैकयी अशी उपमा दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला वराती मागून घोडं नाचवण्याचा प्रकार म्हटले आहे. तसेच, संजय राऊत यांना गांडूळ म्हणत त्यांचा ठाकरे गट नापीक करण्याचा आरोप केला आहे. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना-भाजपमधील मोठ्या पक्षाच्या वादाला या वक्तव्याने नवी उंची दिली आहे. आता भाजप आणि ठाकरे गटाकडून या वक्तव्यावर काय प्रत्युत्तर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या परळी दौऱ्यात शिवसैनिकांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.