क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
म्हसवड :- जिवन मशिन योजनेच्या इस्लामपूर पाणी साठवण टॅक व परिसरात शिल्लाक व फुटलेल्या बिंड या धातुच्या पाणी वितरणाच्या पाईप म्हसवड पालिका प्रशासनास वा पाणी पुरवठा विभागाची परवानगी न घेता ६ लाख रूपये किंमतीच्या पाईप परस्पर कोणाला हि न विचारता चोरीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या. ट्रॅक्टरच्या ट्रॅली मध्ये भरून घेऊन जात असताना माळशिरस पोलिसांनी २० दिवसांपूर्वी कारवाई करत ट्रॅक्टर जप्त करून पोलिस ठाण्यात आणण्यात आला मात्र २० दिवसांत पाईप चोरीची ना दाद, ना फिर्यादीला कोण येत नसल्याने पुढे येत नसल्याने माळशिरस पोलिस ठाण्यातून पाईपसह ट्रॅक्टरच गायब झाला असल्याची घटना घडल्याने चोरी माळशिरस मध्ये मात्र ट्रॅक्टर पाईपसह गायबची चर्चा म्हसवड मध्ये जोरदार सुरू आहे
या बाबत माळशिरस जिल्हा सोलापूर येथील पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी म्हसवड पालिकेच्या पाणी योजनेच्या जवळपास पाच ते सहा लाख किंमतीच्या बिंड धातूच्या पाईप. पालिकेचे मुख्याधिकारी वा पाणी पुरवठा विभागाला न विचारता चोरून नेहत असल्या बाबत माळशिरस पोलिसांना ११२ या नंबर वरून निनावी फोनद्वारे एक बिगर नंबर प्लेट असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॅली मध्ये पाणी पुरवठयाच्या सहा मेन पाईप घालून माळशिरस रोडने एक, ट्रॅक्टर निघाला असल्याचे सांगण्यात आल्यानोतर तात्काळ माळशिरस पोलिसांनीचोरीच्या उद्देशाने घेऊन निघालेला ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात जप्त करून नेहण्यात आला मात्र २० ते २२दिवस होऊन गेले तरी हि या सहा लाख रूपये किंमतींच्या पाईप चोरीची ना दाद ना फिर्याद, कोणच द्वाायला येईना मात्र मदतीसाठी ११२चा कॉल केला पण तक्रारीसाठी ज्या म्हसवड नगरपालिकेच्या पाणी पुरवठयाची पाईप होती त्या पालिकेचे मुख्याधिकारी, पाणीपुरवठा सभापती ना पाणी पुरवठा कर्मचारी कोणच गुन्हा दाखल करण्यास पुढे येत नसल्याने पाईपने भरलेली ट्रॅलीसह ट्रॅक्टर माळशिरस पोलिस ठाण्याच्या आवारात गेले अनेक दिवसांपासून उभा आहे मात्र तक्रार देण्यासाठी कोणीच पुढे का येत नव्हते या पाईप चोरी मागे नक्की कामगार, चोरटे कि भंगाराच्या किंमती मध्ये विकण्याचा भंगार विव्या नगरसेवकांचा तर या पाईप चोरी मध्ये हात तर नाही ना अशी चर्चा सुरू असताना दोन दिवसांपासून पाईपने भरलेली ट्रॅलीसह ट्रॅक्टर माळशिरस पोलिस ठाण्यातून गायब झाल्याचा प्रक्रार समोर आला असून माळशिरस पोलिसांनी पाईपसह ट्रॅली व ट्रॅक्टर जप्त केलेला नक्की गेला कोठे कि भंगार म्हणून तर विकला नाही ना अशी हि चर्चा सध्या सुरू आहे
राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते किशोर सोनवणे यांची प्रतिक्रिया
म्हसवड शहराला ८० कोटी रूपयेची नवी पाणी योजनेचे अपूर्ण काम ठेवून ठेकेदार पळून गेला असल्याने उर्वरित ३० ते ३५ टक्के काम पूर्ण करण्याचे दिवास्वपन तिजोरीत खडखडाट असलेल्या म्हसवड पालिकेवर वेळ आली असून जुन्या पाणी योजनेच्या आधारावर सध्याची ८० कोटींची पाणी योजना तिन महिन्यांपासून सुरू असली तरी निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुना प्लास्टिक गोटा पाईपमुळे आज ही म्हसवडकरांना आठ दहा दिवसातूनच पाणी मिळत आहे तर दुसरीकडे जुन्या पाणी योजनेच्या लहान मोठ्या बिंड धातूच्या फुटलेल्या पाईप, वांल, इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटारीच्या तांब्याच्या तारा व डिपींची तांब्याच्या लाखो रूपये किंमतींच्या तारा नक्की चोरीला गेली कि भंगारात विकल्या या बाबत लवकरच जिल्हाधिकारी यांचेकडे न्याय मागणार
मुख्याधिकारी डॉ सचिन माने म्हसवड नगरपरिषद यांची प्रतिक्रिया
म्हसवड पाणी योजनेच्या काही पाईप ट्रॅक्टर मध्ये घेऊन जातो असताना माळशिरस पोलिसांनी ताब्यात घेऊन माळशिरस पोलिस ठाण्यात आणला असला तरी आणखीही काही साहित्य गेले आहे का याची माहिती घेऊन कारवाई करणार आहे
युवराज सुर्यवंशी सभापती म्हसवड पालिका पाणी पुरवठा यांची प्रतिक्रिया
मी बाहेर गावी होठो त्यामुळे मला या बाबत माहिती नव्हती मात्र आल्यानंतर माहिती घेऊन माळशिरस पोलिसांनी नंबर प्लेट नसलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॅली मध्ये म्हसवड पालिकेच्या पाईप चोरी करून घेऊन जात असताना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणला होता त्याबद्दल मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांचे बरोवर फोनवर गुन्हा दाखल करण्या विषयी चर्चा झाली होती

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.