नगरपंचायतवर उत्साहात स्वागत; नगरविकास योजनांबाबत चर्चा, भाजपा पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक उपस्थित
क्रांती न्युज वृत्त:
आटपाडी नगरपंचायत येथे खासदार किरिट सोमय्या यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक, माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, नगराध्यक्ष यू.टी. जाधव, उपनगराध्यक्षा मीनाक्षी पाटील, मुख्याधिकारी वैभव हजारे, सरचिटणीस विलास काळेबाग, तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले, नगरसेवक अजित जाधव, ऋषिकेश देशमुख, राधिका दौंडे, मनिषा पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आटपाडी शहराच्या विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून, पुढील योजनांबाबत खासदार सोमय्या यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शहरातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.


Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.