विकासकामांसाठी भरीव तरतूद; महसुली उत्पन्नवाढीवर भर
क्रांती न्युज वृत्त:
आटपाडी नगरपंचायतच्या २०२६-२७ साठीचा १०० कोटी ९७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर झाला. नगरसेवकांच्या माध्यमातून सादर झालेला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
नगराध्यक्ष यू.टी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी वैभव हजारे यांनी हा अर्थसंकल्प तयार केला. लेखापाल अक्षता परीट यांनी तो सभेसमोर सादर केला. जमा बाजू १०१ कोटी तर खर्च बाजू १०० कोटी ९७ लाख रुपये इतकी आहे.
योजनांचा समावेश: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोदय, अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार, प्रधानमंत्री आवास २.०, स्वच्छ महाराष्ट्र अभियान आदी योजनांचा समावेश आहे.
तरतुदी: स्मशानभूमी सुधारणा, रस्ते दुरुस्ती, तलाव संवर्धन, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा यासाठी निधी. प्रभाग १३ मध्ये एक कोटींचे नमुना उद्यान प्रस्तावित. भूयारी गटार योजनेसाठी प्रयत्न सुरू.
उत्पन्नवाढ: किराणा, मॉल्स, दवाखाने, ब्युटी पार्लर यांच्या करात दरवाढ. २५००-३००० मालमत्तांची नोंदणी करून अतिरिक्त महसूल उभारणार.
अतिक्रमण हटाव: नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबवणार.
उपनगराध्यक्षा मीनाक्षी पाटील, मुख्याधिकारी वैभव हजारे, लेखापाल अक्षता परीट, सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगराध्यक्ष जाधव यांनी हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण विकासाचा पाया असेल, असा विश्वास व्यक्त केला.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.