क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
अंबरनाथ (जि. ठाणे) - अंबरनाथमध्ये पालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना बाहेर एका गाडीत हत्यारं सापडल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.
अंबरनाथच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात आज पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. ही सभा सुरू असताना सायंकाळच्या सुमारास एका पांढऱ्या गाडीत पोलिसांनी हत्यारं पकडली.
पोलिसांनी दोन जणांनाही ताब्यात घेतलं.
या गाडीत तलवार, टोचा आणि दोन वेगवेगळ्या नंबर प्लेटही सापडल्या.
ही बातमी सभेत पसरल्यानंतर "एखाद्या नगरसेवकावर हल्ला करण्यासाठी हे लोक आले होते का?" अशी चर्चा सुरू झाली.
परिमंडळ ४ मधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच क्राईम ब्रँचचं पथकही नाट्यगृहात दाखल झालं आणि नाट्यगृहाला छावणीचं स्वरूप आलं.
पोलिसांकडून आता पकडण्यात आलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हे दोघे नेमके कोणत्या उद्देशाने तिथे आले होते? याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर याच्या हत्येचं प्रकरण ताजं असतानाच अंबरनाथमध्ये पालिकेची सभा सुरू असणाऱ्या नाट्यगृहाबाहेरील कारमध्ये हत्यारं सापडल्यानं खळबळ उडाली आहे.
| मुद्दा | तपशील |
| ठिकाण | धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह, अंबरनाथ |
| घटना | पालिकेची सर्वसाधारण सभा |
| सापडलं | पांढऱ्या गाडीत हत्यारं |
| हत्यारं | तलवार, टोचा |
| नंबर प्लेट | दोन वेगवेगळ्या |
| ताब्यात | दोन जण |
| चर्चा | नगरसेवकावर हल्ला? |
| पोलीस | परिमंडळ ४, क्राईम ब्रँच |
| तपास | सुरू |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.