⚡ ब्रेकिंग News

उजनी धरणावर होणाऱ्या AI डेटा सेंटरमुळं तीन जिल्ह्यांचं वाटोळं होईल! शेतकऱ्यांचा मोठा विरोध; नेमक्या काय आहेत मागण्या?

'१ लाख १४ हजार कोटींची गुंतवणूक; ६८० एकर जमीन'; '२ टीएमसी शुद्ध पाणी लागतं'; 'दिवसातून २० लाख लिटर पाणी'; 'उजनीचे पाणी १०० टक्के वाटप झाले'; 'पुणे, अहिल्यानगर, सोलापूरचं वाटोळं होणार'; '१०० टक्के विरोध' - खासदार धैर्यशील मोहिते पाटील

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

सोलापूर / माढा - सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी धरणावर एआय (AI) डेटा सेंटर व ग्रीन एनर्जी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी १ लाख १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

मात्र, या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. काही राजकीय नेत्यांनी देखील याला विरोध केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक शेती, भूजल पातळी आणि शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

"उजनी धरणाची परिसंस्था केवळ पाण्यापुरती मर्यादित नाही. येथील मासे, जलवनस्पती आणि स्थलांतरित पक्षी (उदा. फ्लेमिंगो) यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो," अशी माहिती देखील शेतकऱ्यांनी दिली आहे.

"या प्रकल्पामुळे निर्माण होणारी उष्णता, सांडपाणी आणि विद्युतचुंबकीय लहरींमुळे (Radiation) आजूबाजूची शेती नापीक होऊ शकते," अशी चिंता शेतकऱ्यांना आहे.

"त्याचबरोबर धरणात प्रस्तावित २ गिगावॉटचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प (Floating Solar Project) आल्यास स्थानिक मच्छीमारांच्या मासेमारीच्या हक्कांवर गदा येईल. त्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे."

"दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्रातील ठाणे आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथेही अशाच प्रकारे संसाधनांवर पडणाऱ्या ताणामुळे मोठ्या एआय डेटा सेंटर प्रकल्पांना नागरिकांनी संघटित विरोध केला आहे."

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील या एआय डेटा सेंटरला विरोध केला आहे.

"या डेटा सेंटरला मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्याचे," मोहिते पाटील म्हणाले.

"सोलापूर जिल्ह्यातील अनेक योजना १०० टक्के पूर्ण झालेल्या नाहीत."

"गेल्या वर्षी आपल्या जिल्ह्यात ६८० ते ६९० मिलिमीटर पाऊस पडला, तळी बंधारे ओडे भरले तरीदेखील विहिरींनी तळ गाठला आहे. बोअर ५०० फुटाच्या खाली गेले आहेत."

"एआय डेटा सेंटरला २ टीएमसी शुद्ध पाणी लागते. उजनीचे पाणी खराब आहे. स्वच्छ करायला मोठ्या प्रमाणात पाणी वापरणार, त्यातून स्वच्छ दोन टीएमसी पाणी काढणार म्हणजे किती पाणी AI डेटा सेंटरला लागणार, याचा विचार करा,"असे मोहिते पाटील म्हणाले.

"पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्याचे या एआय सेंटरमुळे वाटोळं होणार आहे," असे मोहिते पाटील म्हणाले.

"आमचा १०० टक्के विरोध आहे," असे मोहिते पाटील म्हणाले.

१. पाण्याची प्रचंड टंचाई

"एआय डेटा सेंटरला सर्व्हर थंड ठेवण्यासाठी दररोज करोडो लिटर पाण्याची गरज असते. यामुळे स्थानिक भूजल पातळी कमालीची खाली जाऊन विहीर आणि बोअरवेल बंद पडण्याची शक्यता आहे."

२. शेतीच्या पाण्यावर गदा

"माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आणि पिण्यासाठी देण्यात येणारे पाणी जर एआय डेटा सेंटरकडे वळवले तर शेती उद्ध्वस्त होईल, पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासू शकते."

३. जमिनीचं नुकसान

"सुपीक व बागायती जमिनीचा वापर गैरशेती कामासाठी केला तर स्थानिक शेतकरी अल्पभूधारक व भूमिहीन होतील."

"ऑनलाइन एआय डेटा सेंटरच्या उद्घाटनाचे नियोजन असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली. ६८० एकर जमीन घेतली आहे, त्यामध्ये ४१५ एकरावर पहिला टप्पा करण्यात येणार आहे. राहिलेला टप्पा भीमानगर परिसरात आहे. तर दुसरा टप्पा ३०० ते ४०० एकराचा असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली."

"दिवसातून या सेंटरला २० लाख लिटर पाणी लागते. प्रशासनच सांगत आहे की उजनी धरणातील पाण्याचे १०० टक्के वाटप झाले आहे. मग उजनी धरणातच पाणी नाही तर या कंपनीला हे पाणी कुठून देणार आहेत?" असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

"भविष्यात नदी आणि कॅनॉलला सुटणारे पाणी कमी होणार असल्याचे शेतकरी म्हणाले."

"या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात वीज लागते. यामुळे विजेवर मोठा ताण येण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली."

| मुद्दा | तपशील |

| प्रकल्प | AI डेटा सेंटर + ग्रीन एनर्जी |

| स्थळ | उजनी धरण, माढा तालुका |

| गुंतवणूक | १ लाख १४ हजार कोटी |

| जमीन | ६८० एकर |

| पहिला टप्पा | ४१५ एकर |

| पाणी | दिवसातून २० लाख लिटर |

| विरोध | शेतकरी, खासदार मोहिते पाटील |

| कारणे | पाणी टंचाई, शेती, जमीन, रोजगार |

| परिणाम | तीन जिल्ह्यांचं वाटोळं |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...