क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
दिघंची, ता. आटपाडी : आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे घरासमोर उभी केलेली मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकल चोरून नेल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय नागनाथ ठोंबरे (वय ५१, रा. महावितरणजवळ, दिघंची, ता. आटपाडी) यांनी त्यांची काळ्या रंगाची युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकल घरासमोर उभी केली होती. १० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.१० वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलचे हँडल लॉक तोडून किंवा डुप्लिकेट चावीचा वापर करून ती चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा नोंदणी क्रमांक MH-10-DM-5109 असून, तिची अंदाजे किंमत ४० हजार रुपये आहे.
या प्रकरणी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.५३ वाजता आटपाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप अज्ञात असून, पुढील तपास आटपाडी पोलीस करीत आहेत.
आपली मोटारसायकल सुरक्षित ठिकाणी पार्क करावी, हँडल लॉकसोबत अतिरिक्त सुरक्षा साधनांचा वापर करावा आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना कळवावे.


Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.