क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
आटपाडी : नेलकरंजी गावच्या हद्दीतील भिवघाट परिसरातील म्हसोबा मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने मंदिराच्या गेटलगत असलेला पत्रा उचकटून मंदिरात प्रवेश केला आणि चांदीच्या पादुका तसेच पितळी घंटा चोरी करून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून २ ऑक्टोबरदरम्यान ही चोरी झाली. या घटनेत सुमारे ७० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या दोन पादुका तसेच ३ हजार रुपये किमतीच्या २० पितळी घंटा चोरीस गेल्या आहेत.
याप्रकरणी अभिजीत बाळासो भोसले (वय ३१, रा. नेलकरंजी, ता. आटपाडी) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा र. नं. ३६३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेतील कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची नोंद २ ऑक्टोबर रोजी दुपारी २.४० वाजता करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोहेका/१६९६ गवंड करीत आहेत. चोरीस गेलेला मुद्देमाल अद्याप मिळालेला नसून आरोपीही अज्ञात आहे.
आटपाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.