क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
सांगली : सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार विनायक दत्तात्रय पुजारी (वय ३९, रा. रामनगर, समडोळी, ता. मिरज, जि. सांगली) याच्यावर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे.
विनायक पुजारी याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे गुन्हे तसेच अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
हा प्रस्ताव सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी, मिरज, विशाल यादव यांनी प्रकरणाची कार्यवाही करून विनायक दत्तात्रय पुजारी याला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.
या आदेशानुसार पुजारी याच्यावर सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख, गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरुण ओताडे, तसेच पोलीस कर्मचारी सम्राज राणर, पोहेकॉ बंडू पवार आणि अभिजीत पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.